‘मास्क व्यवस्थित परिधान केला नसेल तर विमानातून प्रवाशाला उतरवा, ‘नो-फ्लाय’ लिस्टमध्ये टाका’ – उच्च न्यायालय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – देशातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता दिल्ली उच्च न्यायालय सतर्क झाले आहे. एअर इंडियाच्या उड्डाणात कोलकात्ताहून दिल्लीकडे जाणारे लोक व्यवस्थित मास्क घालत नाहीत. या संदर्भात दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर मास्क व्यवस्थित लावला नाही तर विमानातून प्रवाशाना उतरवा आणि त्यांना नो फ्लाई लिस्टमध्ये टाकावे.

हा आदेश देताना न्यायमूर्ती सी हरी शंकर म्हणाले, कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता नियमासंबंधी हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. विमानातील प्रवासी बंद वातानुकूलित वातावरणात आहेत. जर त्यांच्यापैकी कोणत्याही प्रवाशाला कोरोना संसर्ग झाला असेल तर इतर प्रवाशांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. ही सर्वसाधारण बाब आहे.

न्यायमूर्ती सी हरीशंकर म्हणाले, कोरोनाच्या रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली आणि जर तो एक हात लांब उभा राहत असेल तरीही ते व्हायरस संक्रमित करण्यासाठी पुरेसे आहे. हायकोर्टाने असा आदेश दिला आहे की, जर कोणी मास्क योग्य प्रकारे घातला नसेल तर त्याला विमानातून खाली उतरवा आणि त्याचे नाव नो फ्लाई लिस्टमध्ये टाका.

दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती सी हरिशंकर यांनी मास्क न घातलेल्या आणि सामाजिक दूरचे पालन न करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध स्वतःच दखल घेतली. ५ मार्च ला कोलकत्ता येथे जात असताना न्यायमूर्तींना हे लक्षात आले की, प्रवाशी हट्टी आहेत आणि ते विमान परिचारिकांच्या सूचना ऐकत नाहीत. ते योग्य प्रकारे मास्क लावला नाही.

मंगळवारी देशात कोरोनाचे १५ हजार ३८८ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. या कळत ६ राज्यांत कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक अशी ही राज्ये आहेत. ज्याठिकाणी ८४.४ % नवीन रुग्णांची नोंदणी झाली आहे.