Coronavirus : ‘इम्यूनिटी’ वाढविण्यासाठी देखील फेस मास्क उपयुक्त ! तज्ञांनी पहिल्यांदाच सांगितले ‘हे’ मोठे फायदे, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच मास्क घालण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र आता आरोग्य तज्ञांनी मास्क घालण्याचा एक नवीन आणि मोठा फायदा सांगितला आहे. एका अहवालात दावा केला आहे की, मास्कमुळे कोरोना विषाणूची गती कमी होतेच, पण रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत होते.

मास्क घातल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्याचा दावा करणारा हा अहवाल ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिकल’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या जॉर्ज डब्ल्यू रदरफोर्ड आणि मोनिका गांधी यांचे म्हणणे आहे की, शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना देण्यासाठी फेस मास्क ‘व्हेरियोलेशन’ प्रमाणे काम करू शकतो. तसेच संसर्गाची गती कमी करू शकते.

इम्युनिटी कशी मजबूत होणार?
तज्ञांचा दावा आहे की, फेस मास्क ड्रॉपलेटसह बाहेर येणाऱ्या संसर्गजन्य घटकांना फिल्टर करु शकतो. शिंकल्यावर किंवा खोकल्यावर अगदी कमी प्रमाणात मास्कमधून व्हायरस बाहेर पडतो. त्यांनी सांगितले की, चेचकची लस येईपर्यंत लोक व्हेरियोलेशनची मदत घेत असत. यामध्ये जे लोक गंभीर आजारी पडले नाहीत, त्यांना चेचक रूग्णांच्या कवचांच्या मटेरियलच्या संपर्कात आणले जात होते.

यामुळे संसर्गाच्या संपर्कात आल्यानंतर लोक गंभीर आजारी पडले नाहीत. शास्त्रज्ञ कोविड-१९ मध्येही अशीच शक्यता शोधत आहेत, जी विषाणूजन्य रोगजनकांच्या जुन्या सिद्धांतावर आधारित आहे. हा सिद्धांत सांगतो की, या आजाराची तीव्रता व्हायरस इनोक्युलम म्हणजे शरीरात जाणाऱ्या विषाणूच्या संसर्गजन्य भागावर अवलंबून असते.

मास्कमुळे संसर्ग कमजोर
संशोधकांनी सांगितले की, या अभ्यासाचे आतापर्यंत सकारात्मक निकाल समोर आले आहेत. वैज्ञानिकांनी अर्जेंटिनामधील एका क्रूझ जहाजाचे उदाहरणही दिले. ते म्हणाले की, क्रूझ प्रवाशांना सर्जिकल आणि एन९५ मास्क दिल्यानंतर २० टक्के रुग्ण असिम्प्टोमॅटिक आढळले, तर सामान्य मास्क दिल्यावर ८१ टक्के लोक असिम्प्टोमॅटिक आढळले. हे सूचित करते की, एक चांगले मास्क संसर्गाची गती रोखू शकतो.