Corona in India : कोरोनाचा वेग वाढला ! 72 हजार नवे रुग्ण, 24 तासांत 452 जणांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – देशात कोरोनाने वेग पकडला आहे. worldometer च्या मते, गेल्या २४ तासाच्या आत ७२ हजार १८२ नवीन केसेस समोर आल्या आहेत आणि ४५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. आता देशात ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ५ लाख ८५ हजारांवर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जवळजवळ १ लाख ६३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात सर्वात जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची नवीन लाट येण्याची शक्यता आहे. ३१ मार्चला राज्यात ३९,५४४ नवीन प्रकरणांची नोंद झाली आणि २७७ लोकांचा मृत्यू झाला. बुधवारपर्यंत राज्यात ३,५६,२४३ केसेस ऍक्टिव्ह होते.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये २४ तासांत ५३९४ नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आणि १५ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये ३१ मार्चला २,८८५ नवीन प्रकरणांची नोंद झाली आणि ५८ लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय पंजाबमध्ये ३१ मार्चच्या सकाळपर्यंत गेल्या ४८ तासांत कोरोनाचे ५०५७ नवीन केसेस आले आणि १२४ लोकांचा मृत्यू झाला.

राजधानी दिल्लीमध्ये ३१ मार्चला अडीज महिन्यानंतर सर्वात अधिक लोकांच्या मृत्यूची नोंद केली गेली. बुधवारी राजधानीमध्ये २४ तासांत १८१९ नवीन केसेसची नोंद झाली आणि ११ लोकांचा मृत्यू झाला. १३ जानेवारीलाही ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. सध्या ऍक्टिव्ह केसेसची संख्या ८८३८ आहे. दिल्लीमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या एकूण ११,०२७ झाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये बुधवारी २४ तासांत १,२३० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामध्ये सर्वात अधिक लखनऊमध्ये ३६१ आणि वाराणसीमध्ये १०० केसेसची नोंद केली गेली. प्रयागराजमध्ये एका दिवसात २१३ नवीन प्रकरणे सापडली आणि दोन लोकांचा मृत्यू झाला. लखनऊ विश्वविद्यालयाच्या ७ प्राध्यापकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या एक आठवड्यात ऍक्टिव्ह केसेसची संख्या दोन पटापेक्षा जास्त वाढली आहे.

बिहारमध्ये गेल्या २ दिवसात कोरोना केसेसमध्ये वेगात वाढ झाली आहे. गेल्या रविवारी होळीनंतर बिहारमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. सोमवारी २३९ नवीन केस समोर आले, तर मंगळवारी बिहारमध्ये फक्त ४ प्रकरणे आली.

दक्षिणी राज्य तामिळनाडूमध्ये २५७९ नवीन प्रकरणांची नोंद झाली आणि १९ व्यक्ती मृत पावल्या. आतापर्यंत राज्यात एकूण प्रकरणाची संख्या ८,८६,६७३ झाली आहे आणि १२,७१९ लोकांचा मृत्यू झाला आहे. बुधवारपर्यंत येथे १५,८७९ केसेस ऍक्टिव्ह होत्या. कर्नाटकात बुधवारी ४,२२५ नवीन प्रकरणाची नोंद झाली आणि २६ लोकांचा मृत्यू झाला. बंगळूरमध्ये सर्वाधिक २,९२८ प्रकरणांची नोंद झाली.