Corona in Maharashtra | ‘नागरिकांनाे काळजी घ्या !’ महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 1300 पार; मास्क वापरण्याचं सरकारचं आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Corona in Maharashtra | मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांच्या (Corona in Maharashtra) संख्येत वाढ होताना दिसत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता राज्याची चिंता लागून राहिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनं नियंत्रण मिळवलं असलं तरी आता कोरोनाची चौथी लाट (Fourth Wave Of The Corona) येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra State Government) नागरीकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत राज्यामध्ये 1,357 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. दैनंदिन आकडा वाढत असताना चिंता वाढली आहे.

 

काल (शुक्रवारी) राज्यात 1,034 नव्या रुग्णांची नोंद (Corona in Maharashtra) झाली होती. तसेच, 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. त्याचबरोबर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आज (शनिवारी) हा आकडा थेट 1,357 वर नोंदवण्यात आला आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 8.06 टक्के आहे. तसेच, मृत्यूदर 1.87 टक्क्यांवर नोंदवण्यात आलाय.

 

आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले ?
“आपल्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रायगड, ठाणे आहे. यामध्ये जी संख्या वाढत आहे. त्या संख्येमुळे केंद्रीय आरोग्य विभागानं (Central Health Department) आम्हाला एक पत्र पाठवलं की या जिल्ह्यांपुरत्या तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतील. या पार्श्वभूमीवर आता मास्क वापरण्याचं केवळ आवाहन करण्यात आलं आहे.” असं राजेश टोपे म्हणाले.

 

Web Title :- Corona in Maharashtra 1357 new corona cases in last 24 hours in maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा