Corona in Mumbai | मुंबईकरांना मोठा दिलासा ! नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचा (Corona in Mumbai) प्रचंड उद्रेक पाहायला मिळत होता. मात्र आता मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज दिवसभरात 11 हजार 317 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona in Mumbai) आढळले आहेत. तर 22 हजार 073 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईकरांसाठी गेल्या काही दिवसांमधील ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे.

 

 

मुंबईत सध्या 84 हजार 352 रुग्ण सक्रिय (Active Patient) आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे (Recover Patient) होण्याची टक्केवारी थोडी घसरली होती. पण आज ही टक्केवारी 89 टक्क्यांवर पोहचली आहे. मुंबईतील कोरोनाबाधित (Corona in Mumbai) रुग्ण दुपटीचा दर हा 39 दिवसांवर आला आहे. तर कोरोना संसर्ग वाढीचा दर हा 1.74 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

 

सध्या मुंबईमध्ये रुग्णालयातील 16.8 टक्केच खाटा भरलेल्या आहेत. मात्र मृत्यूचा आकडा मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. मुंबईत आजपर्यंत 9 लाख 81 हजार 306 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 8 लाख 77 हजार 884 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 16 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :- Corona in Mumbai | Great relief to Mumbaikars! Twice as many recover from new corona infections

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

Modi Government | महाराष्ट्र सरकारला खोटे ठरवण्याचा डाव? मोदी सरकारकडून ‘ते’ वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा

 

 Uttar Pradesh Election 2022 | भाजपचे 2 मंत्री, 6 आमदार, माजी आमदार ‘समाजवादी पार्टी’त

 

Almond And Raisins Benefits | ‘या’ वेळी खा बदाम आणि बेदाणे एकत्र, ‘हे’ आजार दूर राहतील; तुम्हाला मिळतील 7 आश्चर्यकारक फायदे