Corona Lockdown | विरारमध्ये हॉटेल व्यावसायिकाची आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा (Corona Lockdown) फटका प्रत्येक क्षेत्राला बसला आहे. लॉकडाऊनमुळे (Corona Lockdown) अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. विरारमध्ये एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाने आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या (virar hotelier commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आली असून आत्महत्येपूर्वी व्यावसायिकाने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये काही जणांची नावे आहे. परंतु चिठ्ठीमधील मजकूर अर्नाळा सागरी पोलिसांनी (arnala sagari police) गुप्त ठेवला आहे. त्यामुळे आत्महत्येचे खरे कारण स्पष्ट झाले नाही. करुणाकरण पुत्रन (वय-48) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे.

याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात (arnala sagari police station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करुणाकरण पुत्रन यांच्या आत्महत्येमुळे दोन लहान मुलांना वडिलांचे छत्र गमवावे लागले आहे. विरार पश्चिम येथील वाय के नगर परिसरात असलेल्या स्टार प्लॅनेट (Star Planet) या हॉटेलचे संचालक करुणाकरण पुत्रन यांचा गुरुवारी (दि.15) सकाळी नऊच्या सुमारास हॉटेलमधील छताला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

पोलिसांकडून सुसाईड नोट ताब्यात

घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. घटनास्थळावर पोलिसांना एक चिठ्ठी (Suicide note) मिळाली असून पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे. या चिठ्ठीत अनेक दिवसांपासून हॉटेल चालत नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली होती. हॉटेल मालकाचे भाडे थकले होते. लाईट बील भरायला पैसे नव्हते, कामगारांचा पगार निघत नव्हता. हॉटेल मालक भाड्यासाठी तगादा लावत होते. या सर्व आर्थिक टंचाईला वैतागून आत्महत्या करत आहे, असे चिठ्ठीत लिहल्याची चर्चा परिसरात आहे.

हे देखील वाचा

Mulund News | फरसाण न दिल्याच्या कारणावरून PSI ने घेतला सूड; Weekend lockdown चं कारण देत दुकानदारास बेदम मारहाण (व्हिडीओ)

Pune Fire News | पुण्याच्या बाणेर येथील भारतीय विज्ञान शिक्षा व अनुसंधान संस्थेत भीषण आग, अग्नीशमन दलाचे 5 बंब घटनास्थळी

Mumbai-Nashik Highway | मुंबई-नाशिक महामार्गावर टोमॅटोचा ट्रक उलटला; 20 टन टोमॅटोचा महामार्गावर खच, वाहतूक विस्कळीत (व्हिडिओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Corona Lockdown | virar hotelier commits suicide due to thackeray govt imposed lockdown restrictions

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update