Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 727 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर शहरातील 6 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील दोघांचा शहरात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात 398 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात कोरोनाचे 245 क्रिटिकल रूग्ण असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 1 हजार 189 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 1 लाख 92 हजार 89 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या कोरोनाचे 4 हजार 253 रूग्ण सक्रिय आहेत. शहरातील तब्बल 4847 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात आलं आहे.