Coronavirus : दिलासादायक ! देशातील ‘कोरोना’च्या रिकव्हरीचा रेट पोहचला 75 % च्या जवळ, 22 लाखाहून जास्त रूग्ण झाले बरे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशभरात मागील 24 तासात विक्रमी 57,989 कोरोना व्हायरस संक्रमित रूग्ण बरे झाले आहेत, ज्यामुळे देशातील कोरोना रिकव्हरी रेट वाढून 75 टक्केच्या जवळ पोहचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात देशभरात 57,989 कोरोना रूग्ण बरे झाले. ज्यामुळे संसर्गावर मात करणार्‍या व्यक्तींची एकुण संख्या वाढून 22,80,566 झाली आहे. ही संख्या एकुण संक्रमितांच्या 74.90 टक्के आहे.

भारतात कोरोना व्हायरसच्या एकुण प्रकरणांचा आकडा रविवारी 30 लाखांच्या पुढे गेला, तर 16 दिवसांपूर्वी ही संख्या 20 लाखांच्या पुढे पोहचली होती. देशात कोविड-19 ची प्रकरणे 21 दिवसात 10 लाखांनी वाढून 20 लाख झाली होती, तर 59 दिवसात संक्रमणाची प्रकरणे एक लाखाने वाढून 10 लाखांच्या पुढे गेली होती. देशात कोविड-19ची प्रकरणे एक लाखापर्यंत पोहचण्यासाठी 110 दिवस लागले होते, तर यानंतर 10 लाखांच्या पुढे जाण्यासाठी केवळ 59 दिवस लागले.

मृत्युदर घटून 1.86 टक्के झाला

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी आठ वाजता जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात देशात कोरोना संसर्गाची 69,239 नवी प्रकरणे समोर आल्याने एकुण प्रकरणांची संख्या वाढून 30,44,940 झाल, तर संक्रमणामुळे आणखी 912 लोकांचा मृत्यू झाल्याने मृत्यूंची एकुण संख्या 56,706 झाली आहे. देशात आता कोविड-19 प्रकरणात मृत्युदर घटून 1.86 टक्के राहिला आहे.

3.52 लाखांपेक्षा जास्त नमूण्यांची तपासणी

आकड्यांनुसार, देशात सध्या 7,07,668 रूग्णांवर उपचार सुरू आहेत, जे आतापर्यंत आलेल्या एकुण प्रकरणांच्या 23.24 टक्के आहेत. भारतात कोविड-19 ची प्रकरणे सात ऑगस्टला 20 लाखांपेक्षा जास्त झाली होती. 22 ऑगस्टपर्यंत देशात एकुण 3,52,92,220 नमूण्यांची तपासणी झाली होती. शनिवारी 8,01,147 नमूण्यांची तपासणी झाली.