Corona Treatment | कोविडवर उपचारासाठी ‘ही’ 3 औषधे घेण्याचा केंद्र सरकारने दिला सल्ला; जाणून घ्या मेडिसीनची नावे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Corona Treatment | देशात कोरोना (Coronavirus) आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Covid Variant) रूग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. दैनंदिन बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्यासह देशाची चिंता वाढली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून (Central Government) एक महत्वाचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करत असताना जी औषधे दिली जातात त्यांचा अतिरेक झाल्यास किंवा चुकीचा वापर झाल्यास कोरोना बाधित रुग्णाला ब्लॅक फंगसला (Black Fungus) सामोरे जावे लागू शकते, याबाबत केंद्र सरकारने भीती व्यक्त केली आहे. तसेच त्यावेळी कोणती औषधे देणे (Corona Treatment) आवश्यक असल्याचा सल्ला देखील दिला आहे.

 

 

औषधांचा अतिरेक झाल्यास कोरोना बाधिताला ब्लॅक फंगसच्या रूपाने नव्या संकटाला सोमोरे जावे लागेल, असा धोक्याचा इशारा निती आयोगाचे सदस्य आणि राष्ट्रीय कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी दिला आहे. डॉ. पॉल यांच्या माहितीनूसार, ”कोरोना बाधित रुग्णांवरील उपचार तर्कसंगत असावेत, कोरोना बाधित रुग्णावर उपचार करताना औषधांचा ‘ओव्हरयूज’ आणि ‘मिसयुज’ टाळण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधांचा अतिरेक झाल्यामुळे अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिसला (Mucor-Mycosis) सामोरे जावे लागले. ही स्थिती टाळायची असेल तर आपण सावध राहिले पाहिजे, तसेच, स्टेरॉइड्समुळे म्युकरमायकोसिसचा धोका वाढतो. स्टेरॉइड्स उपयुक्त ठरत असले तरी त्याचे साइड इफेक्ट गंभीर आहेत. इम्युन सिस्टमवरही त्याचे परिणाम होतात.” असे त्यांनी सांगितलं. (Corona Treatment)

 

 

डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, ”कोरोनावरील उपचारांसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार ताप आल्यास पॅरासिटेमॉल आणि कफ असल्यास आयुष सीरप घेता येईल. कफ 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस असल्यास बुडेसोनाइडचा (Budesonide) इन्हेलर (Inhaler) घ्यावा आणि गरम पाण्याच्या गुळण्याही कराव्या.” अशा गोष्टी तुम्ही घरी करू शकता.

 

दरम्यान, ”तुम्हाला रुग्णालयात दाखल केले आणि तिथे ऑक्सिजन लावावा लागला तर मेथिलप्रेडनिसोलोन (Methylprednisolone) आणि डेक्सामेथासोन (Dexamethasone) ही औषधे देता येतील.
हेपरिन (Heparin) हे औषध देखील डॉक्टर देऊ शकतात, रुग्ण घरी असल्यास रेमडेसीवीर (Remdesivir) दिले जाऊ नये.
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाला आवश्यकतेनुसार रेमडेसीवीर देण्याचा सल्ला दिला गेलेला असून याबाबतच्या सुचनेचे काटेकोरपणे पालन केले जावे,”
अशी माहिती डॉ. पॉल यांनी दिली.

 

 

Web Title :- Corona Treatment | steroids can increase the chances of mucormycosis says dr v k paul suggest 3 medicine on corona

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कंटेनरमध्ये 22 लाखांचा गुटखा, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

 

Maharashtra IPS Officer Transfer | भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

 

Pune Corporation | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासाला महापालिकेचे प्राधान्य – महापौर मुरलीधर मोहोळ