तुमचे Corona Vaccine Certificate बनावट तर नाही ना? अशाप्रकारे CoWIN पोर्टलवर करू शकता चेक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Corona Vaccine Certificate | कोविडदरम्यान कोरोना सर्टिफिकेट एक महत्वाचे कागदपत्र झाले आहे. या कागदपत्राचा वापर रेस्टॉरंट, नाईट क्लब, सिनेमा हॉल आणि स्टेडियममध्ये जाताना करता येऊ शकतो. कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर हे सर्टिफिकेट दिले जाते. हे तुम्ही कोविड (CoWIN) पोर्टलवरून डाऊनलोड करू शकता. (Corona Vaccine Certificate)

 

व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये नाव, वय, आयडीसह व्हॅक्सीनेशन डिटेल्स आणि एक QR कोड दिला जातो. क्यूआर कोड असेल तर कुणीही सर्टिफिकेटवर आपला फोटो चिकटवून याचा चुकीचा वापर करू शकणार नाही. परंतु तरीसुद्धा बनावट सर्टिफिकेट जारी होण्याचा धोका असू शकतो. यासाठी तुम्हाला कोरोना सर्टिफिकेट व्हेरिफाय करण्याबाबत जाणून घेतले पाहिजे.

 

डिजिटल covid-19 vaccination certificates यूरोप संघ आणि अमेरिकेत डार्क वेबवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, यापैकी अनेक सर्टिफिकेट बनावट दिसतात. याशिवाय इतर सर्टिफिकेट राष्ट्रीय डेटाबेसवर उपलब्ध आहे. ज्यांचा वापर बनावट कोविड सर्टिफिकेट जारी केले जाऊ शकते. यासाठी आवश्यक आहे की, आपल्या कोविड प्रमाणपत्राची सत्यता पडताळून पहा.

असे तपासा Corona Vaccine Certificate खरे की बनावट :
कोरोनाचे सर्टिफिकेट दोन माध्यमातून तपासता येऊ शकते. Co-WIN लसीकरण प्रमाणपत्रात डिजिटल प्रकारे हस्ताक्षरित सुरक्षित क्यूआर कोड असतो. जे स्कॅन करून किंवा एखाद्या इतर माध्यमातून ऑनलाइन आपल्या कोरोना सर्टिफिकेटची तपासणी करू शकता.

 

ऑनलाइन असे करा व्हेरिफाई :

सर्वप्रथम https://verify.cowin.gov.in/ वर जा.

नंतर स्कॅन क्यूआर कोडवर क्लिक करा.

यानंतर क्यूआर कोड दिसेल.

आता फोनच्या स्कॅनरने स्कॅन करा.

काही वेळात पूर्ण डिटेल येईल. ज्यामध्ये नाव, वय, लिंग, डोसची तारीख, सर्टिफिकेट आयडी आणि इतर माहिती असेल.

जर सर्टिफिकेट योग्य नसेल तर स्क्रीनवर प्रमाणपत्र अमान्य संदेश दिसेल.

 

Web Title :- Corona Vaccine Certificate | is your corona vaccine certificate fake somewhere in this way you can check on cowin portal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Bigg Boss 15 | देवोलिनामुळे राखी सावंत आणि तिचा पती रितेशच्या नात्यात आली ‘दरार’ ! राखीने बजावलं रितेशला, म्हणाली…

अवघ्या 65 हजार रुपयात 122 km ची रेंज देते Hero Electric ची ही इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मार्केटयार्ड पोलिसांकडून अटक