Pune Crime | वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना मार्केटयार्ड पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या (Marketyard Police Station) हद्दीत वाहन चोरीच्या (Vehicle theft) गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक दुचाकी जप्त करुन एक गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई पुण्या तील (Pune Crime ) मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर रिक्षा स्टँड येथे सापळा रचून करण्यात आली.

 

जैद जमीर दलाल (वय-20 रा. घोरपडी पेठ, मोमीनपुरा कब्रस्थान जवळ, पुणे) आणि जैद अमजद खान (वय-19 रा. गुरुवारपेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील तपासी पथक गुरुवारी (दि.2) हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अनिस शेख (Anis Sheikh) यांना माहिती मिळाली की, रिक्षा स्टँडजवळ दोन सराईत गुन्हेगार सुझुकी अ‍ॅक्सेस मोपेड (Suzuki Access Moped) गाडीवर आले आहेत. त्यांच्याकडून कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी वाहन पोर्टल अ‍ॅपवर (Vehicle Portal app) गाडीची माहिती मिळवली. गाडी मालकाच्या मोबाईलवर फोन करुन चौकशी केली असता गाडी चोरीला गेल्याचे सांगितले. तसेच याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींना डेक्कन पोलिसांच्या (Pune Crime) ताब्यात दिले.

 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addi CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशपांडे (Senior Police Inspector A.V. Deshpande),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) सविता ढमढेरे (Police Inspector Savita Dhamdhere) यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक कदम,
पोलीस हवालदार हिरवळे, जाधव, अनिस शेख, स्वप्निल कदम, संदिप सुर्यवंशी, लोणकर, अनिरुद्ध गायकवाड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Marketyard police arrest two criminals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांनी आपल्या कन्येचे केले रजिस्टर लग्न; भावुकहून म्हणाले…

Miss Universe 2021 | उर्वशी रौतेलाला आमंत्रण, आता जज करेल मिस यूनिवर्स कॉन्टेस्ट

Ankita Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता होणार ठाकरे घराण्याची सून ! राज ठाकरेंना ‘शिवतीर्था’वर जाऊन दिले लग्नाचे आमंत्रण