धक्कादायक ! ‘कोरोना’ग्रस्त गायिका कनिकाच्या पार्टीत सहभागी झालेले खा. दुष्यंत सिंह गेले होते राष्ट्रपती भवनात

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भाजपपचे खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बॉलिवूड पार्श्वगायिका कनिका कपूरच्या एका पार्टीत सहभागी झाले होते. शुक्रवारी जेव्हा हे प्रकरणं समोर आले तेव्हा बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. उत्तर प्रदेशात लखनऊमध्ये आयोजित या (15 मार्च) पार्टीमध्ये सहभागी झालेले दुष्यंत सिंह त्यानंतर इतर अनेक कार्यक्रमात सहभागी झाले.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह या पार्टीनंतर तीन दिवसांनी 18 मार्चला राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारोहात देखील सहभागी झाले होते. बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यूपी आणि राजस्थानच्या खासदारांनासाठी राष्ट्रपती भवनात ब्रेकफास्टचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमाचा एक फोटो समोर आला. ज्यात दुष्यंत सिंह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पाठीमागे उभे आहेत. परंतु हे देखील वृत्त आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी दुष्यंत सिंह आणि अन्य खासदारांशी हस्तांदोलन केले नाही.

यानंतर दुष्यंत गुरुवारी आणि शुक्रवारी संसदेत गेले होते. त्यांनी संसदेत अनेक खासदारांशी चर्चा केली. ते सेंट्रल हॉलमध्ये देखील दिसले. लोकसभेत त्यांच्या बाजूला बसलेल्या निशिकांत दुबे यांनी सांगितले, दुष्यंत सिंह आयसोलेशनमध्ये आहेत. टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी संसद सत्र स्थगित करण्याची मागणी केली आहे. ते दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत दुष्यंत सिंह यांच्या शेजारी बसले होते.

वसुंधरा राजे यांनी स्वीकारले की ते आणि त्यांचे पुत्र दुष्यंत सिंह लखनऊमध्ये बॉलिवूड गायिका कनिका कपूरच्या पार्टीत सहभागी झाले होते. त्यानंतर आता या दोघांनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. वसुंधरा राजे म्हणाले, काही दिवसांपूर्वी दुष्यंत आणि त्याच्या सासरच्या मंडळींसोबत मी एका डिनरला गेले होते. कनिका कपूर, जी कोरोनाग्रस्त आढळली आहे. ती देखील तेथे उपस्थित होती. सावधानता म्हणून मी आणि दुष्यंत सेल्फ – आयसोलेशनमध्ये आहोत आणि आवश्यक निर्देशांचे पालन करत आहोत.