Coronavirus : महत्वाचं ! 50 % अल्कोहोलमध्येच ‘निष्प्रभ’ होतो कोरोना ‘व्हायरस’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – संपूर्ण जगभरात उच्छाद मांडलेला कोरोना विषाणू ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण असलेले सॅनिटायझर, डेटॉल आणि साबणाचा वापर केला तरच निष्प्रभ ठरू शकतो, असे मत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि विषाणू शास्त्रज्ञांनी व्यक्‍त केले आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कोणतीही लस किंवा औषध अद्याप उपलब्ध झालेले नाही. अमेरिकेसह काही देशांनी या आजारावर प्रतिबंधक औषध वापरण्यासाठी सध्या मलेरियावर उपयुक्‍त असलेल्या प्रचलित हायड्रॉक्सिक्‍लोरोक्‍विनचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करण्याचे आवाहन आधीच केले होते. मात्र, त्यावर जालीम उपाय अजून मिळालेले नाही.

जगभरातील सरकारांप्रमाणेच भारत सरकार आणि इतर राज्य सरकारेही वेळोवेळी हात स्वच्छ करण्याचे आवाहन करत आहे. यासाठी वेळोवेळी हँड सॅनिटायझर, हँड वॉशरचा, प्रसंगी घरगुती साबणाचाही वापर करा, असा सल्‍ला जनजागरण मोहिमांद्वारे दिला आहे. मात्र, अश्या गंभीर परिस्थितीतही बनावट अथवा निकृष्ट दर्जाचे हँड सॅनिटायझर बाजारात विकले जात आहे. कोणत्या ब्रँडच्या साबणामध्ये ५० टक्के अल्कोहोल असते याबाबत सामान्य जनतेला माहिती नाही. बहुतांश ठिकाणी डेटॉलमध्ये पाणी टाकून ते हातावर घेतले जाते. मात्र डेटॉलमध्ये अथवा सॅनिटायझरमध्ये पाणी टाकल्यास त्याची परिणामकारकता कमी होते. ज्यामुळे कोरोना विषाणू नष्ट होत नाही आणि त्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोकाच अधिक असतो. त्यामुळे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अल्कोहोल असलेली निर्जंतुके वापरण्याचा सल्‍ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

व्हायरसला अल्कोहोल विषासारखे !

विषाणू शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ५० टक्के आणि त्यापेक्षा जास्त प्रमाण असलेले कोणतेही रासायनिक द्रव्य कोरोना विषाणूवर विषासारखे काम करते. अल्कोहोलमध्ये प्रोटिनपासून बनलेली कोरोनाची रचना बिघडते आणि ‘आरएनए’ची प्रजोत्पादन शृंखला तुटल्याने त्याचा नायनाट होतो.

कसा हल्‍ला करतो कोरोना विषाणू

‘कोव्हिड-१९’ या विषाणूमध्ये रायबो न्यूक्‍लिक अ‍ॅसिड (आरएनए) असते. जे सर्व प्राणी आणि वनस्पती यांच्या पेशीत सापडणारे एक रासायनिक द्रव्य असते. त्यांचा आरएनए हा त्याची ‘ब्ल्यू प्रिंट’ असते. जेव्हा हा विषाणू एखाद्या व्यक्‍तीच्या नाक, तोंड, डोळे आणि त्वचेच्या संपर्कात येतो, तेव्हा तो ‘नॉब’सारखे ग्लायकोप्रोटिनयुक्‍त बोटे (प्रोजेक्शन) पेशींच्या आत घुसवतो आणि तो ‘आरएनए’ फुफ्फुसाच्या पेशीत ओततो आणि १४ दिवसांच्या ‘इनक्युबेशन पीरियड’मध्ये हा व्हायरस एका ‘आरएनए’चे कोट्यवधी ‘आरएनए’ प्रजोत्पादित करतो. हा विषाणू पहिला हल्ला फुफ्फुसांवर करतो. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये सर्वात आधी न्यूमोनियाची लक्षणे दिसतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like