Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 64553 नवे पॉझिटिव्ह तर 1007 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात एका दिवसात कोरोना व्हायरस संसर्गाची 64,553 नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि यासोबतच संसर्गाची एकुण प्रकरणे वाढून 24,61,190 झाली आहेत. मागील 24 तासात 1007 लोकांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला आहे. तर, देशात 17,51,555 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. संक्रमणमुक्त होणार्‍यांच्या संख्येत वाढ झाल्याने देशात बरे होण्याचा दर 70.77 टक्के झाला आहे. सोबतच देशात मृत्युदर कमी होऊन 1.96 टक्के झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेले आकडे…

* मागील 24 तासात कोरोनामुळे झालेले मृत्यू 1007
* मागील 24 तासात संक्रमितांची संख्या 64,553
* कोरोनाची एकुण प्रकरणे 24,61,190
* एकुण मृत्यू 48,040
* एकुण अ‍ॅक्टिव्ह केस 6,61,595
* बरे झालेल्या रूग्णांची संख्या 17,51,555

महाराष्ट्रात गुरूवारी कोरोना व्हायरस संक्रमणाची 11,813 नवी प्रकरणे समोर आली, ज्यानंतर राज्यात संक्रमणाची एकुण प्रकरणे वाढून 5,60,126 झाली आहेत. गुरुवारी राज्यात कोविड-19 मुळे आणखी 413 रूग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे एकुण मृतांची संख्या वाढून 19,063 झाली आहे. तर, मागील 24 तासात 9,115 रूग बरे झाले आहेत. सध्या राज्यात 1,49,798 रूग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोविड-19 चे 3,90,948 रूग्ण बरे झाले आहेत आणि 29,76,090 लोकांची टेस्ट करण्यात आली आहे.

पुण्यातील 4 हॉस्पीटलमध्ये होणार वॅक्सीनची ट्रायल
पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाला डीसीजीआयकडून फेज टू आणि फेज थ्री ह्यूमन ट्रायलची परवानगी मिळाली आहे. ही ट्रायल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देशातील 17 हॉस्पीटलमध्ये सुरू होणार आहे. यापैकी 4 हॉस्पीटल पुण्यातील आहेत. सुमारे 1600 लोकांना ही कोविड वॅक्सीन दिली जाईल. प्रत्येक व्यक्तीला दोन डोस देण्यात येतील आणि दोन डोसदरम्यान 28 दिवसांचे अंतर असेल.

जगात 2.8 कोटी संक्रमित
जगात कोरोना प्रकरणांमध्ये वेगाने वाढ होत आहे. आतापर्यंत 2 कोटी 8 लाखांपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सुमारे 7 लाख 48 हजार लोकांनी आपला जीव गमावला आहे.