‘कोरोना’ व्हायरसच्या साऊथ अफ्रीका आणि ब्राझील व्हेरिएंटची भारतात एन्ट्री, आतापर्यंत 4 रूग्ण आढळले

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसमध्ये यूके व्हेरिएंटनंतर आता दक्षिण अफ्रीकन आणि ब्राझील व्हेरिएंटची भिती समोर आली आहे. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटले की, फेब्रुवारीच्या पहिल्या आठड्यात सास-कोव-2 च्या ब्राझील व्हेरिएंटची माहिती मिळाली. व्हॅक्सीनच्या प्रभावाची माहिती घेण्यासाठी प्रयोग सुरू आहेत. त्यांनी हे सुद्धा म्हटले की, दक्षिण अफ्रीकन आणि ब्राझीलियन व्हेरिएंट, यूकेच्या व्हेरिएंटपेक्षा वेगळा आहे.

इंडियन सेंटर फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटले की, दक्षिण अफ्रीकेहून येथून परलेल्या 4 लोकांमध्ये दक्षिण अफ्रीकन स्ट्रेनला दुजोरा मिळाला आहे. सर्व प्रवाशांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची टेस्टिंग करण्यात आली असून त्यांना क्वारंटाइन केले आहे. याशिवाय ब्राझीलियन व्हेरिएंट संबंधीत एक प्रकरण नोंदले गेले आहे.

यूके व्हेरिएंटच्या आतापर्यंत 187 केस : आयसीएमआर
त्यांनी म्हटले की, यूके व्हेरिएंटची आतापर्यंत देशात 187 प्रकरणे आहेत. यूके व्हेरिएंटने संक्रमित लोकांपैकी कुणाचाही मृत्यू झालेला नाही. सर्व पॉझिटिव्ह केस क्वारंटाइन करण्यात आल्या आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आयसोलेट करण्यात आले आहे आणि टेस्टसुद्धा करण्यात आली आहे. आपल्याकडे उपलब्ध व्हॅक्सीनमध्ये व्हायरसच्या यूके व्हेरिएंटला सुद्धा निष्प्रभावी करण्याची क्षमता आहे. आयसीएमआर-एनआयव्ही पुणेमध्ये व्हायरस स्ट्रेनला यशस्वीपणे आयसोलेट करण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले की, आम्ही यूकेहून येणार्‍या प्रवाशांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे, जे लोक पॉझिटिव्ह आढळले त्यांचा जीनोम अनुक्रमित केला जात आहे. ती एक चांगली रणनिती आहे. मला आशा आहे की, आपण दक्षिण अफ्रीका आणि ब्राझीलहून उड्डाणांसाठी अशाच प्रकारच्या रणनितीचे पालन करू शकतो.

44 देशांमध्ये दक्षिण अफ्रीकन व्हेरिएंट
त्यांनी म्हटले की, दक्षिण अफ्रीका आणि ब्राझीलहून भारतात जाणारी उड्डाणे आखाती देशांतून जातात, भारतासाठी कोणतेही थेट उड्डाण नाही. नागरी विमानन मंत्रालयाचे संपूर्ण प्रकरणांवर लक्ष आहे.

आयसीएमआरचे महासंचालकांनी सांगितले की, दक्षिण अफ्रीकी व्हेरिएंट, अमेरिकेसह जगातील 44 देशांमध्ये पसरला आहे. भारतात दक्षिण अफ्रीकन व्हेरिएंटची 4 प्रकरणे समोर आली आहेत आणि हे लोक अंगोलिया (1), तंजानिया (1) आणि दक्षिण अफ्रीका (2) हून आले होते. तर यूके व्हेरिएंट जगातील 82 देशांमध्ये पसरला आहे तर ब्राझीलचा स्ट्रेन 15 देशांमध्ये पसरला आहे. भारतात याचे पहिले प्रकरण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात समोर आले होते.