Covid-19 : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 44684 नवे पॉझिटिव्ह, जगभरात विक्रमी साडेसहा लाख केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांच्या संख्येने अजूनही दिलासा दिला आहे. मात्र, राजधानी दिल्लीतील बिघडत चाललेल्या स्थितीने सर्वांनाच अस्वस्थ केले आहे. याच कारणामुळे दिवाळीच्या निमित्ताने लोकांना घरातच कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी सकाळी जारी आकड्यांनुसार मागील 24 तासांत कोविड-19 संसर्गाच्या 44 हजार 684 नव्या केस समोर आल्या आहेत, तर 520 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नव्या केस समोर आल्यानंतर देशात आतापर्यंत कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 87,73,479 झाली आहे, तर तिकडे जगभरातील विविध देशात कोरोना व्हायरसचा कहर पुन्हा वाढताना दिसत आहे. यामुळेच जगभरात मागील 24 तासात 6 लाख 56 हजार नवीन केस समोर आल्या. यामध्ये सर्वांत जास्त केस अमेरिकेत 1 लाख 84 हजार नवीन केस, तर इटलीत सुमारे 41 हजार नवीन केस समोर आल्या आहेत. दोन्ही देशांसाठी ही विक्रमी संख्या आहे.

आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात आतापर्यंत 81,63,572 लोक रिकव्हर झाले आहेत, तर देशात सध्या 4 लाख 80 हजार 719 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूंनंतर देशात मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 29 हजार 188 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासात 9,29,491 कोरोना तपासण्या करण्यात आल्या. सध्या कोरोनाने सर्वाधिक प्रभावित राज्य दिल्ली आहे. दिल्लीत मागील 24 तासात 7,802 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर महामारीने पीडित एकूण लोकांची संख्या शुक्रवारी 4.74 लाखांच्या पुढे गेली आहे. तर, आणखी 91 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या वाढून 7,423 झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची 4,132 नवी प्रकरणे, 127 मृत्यू
महाराष्ट्रात शुक्रवारी कोविड-19 ची 4,132 नवी प्रकरणे समोर आली, ज्यानंतर राज्यात संक्रमितांची संख्या वाढून 17,40,461 झाली. संसर्गामुळे राज्यात आणखी 127 लोकांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यूंची संख्या वाढून आता 45,809 झाली आहे. या दरम्यान 4,543 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात 16,09,607 लोकांनी संसर्गावर मात केली आहे. सध्या 84,082 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.