Coronavirus : ब्रिटनमध्ये नव्या स्ट्रेनचा ‘कहर’ ! आजपर्यंतचे सर्वाधिक ‘कोरोना’बाधित आढळले

लंडन : वृत्तसंस्था – कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना नावाच्या विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संक्रमणाची ब्रिटनमध्ये नोंद झाली आहे. एका दिवसात सर्वाधिक म्हणजे ६० १९६ नवे रुग्ण सापडले आहेत.

दरम्यान ब्रिटनमध्ये, कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. गट आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात ३० टक्क्यांनी अधिक रुग्णांची भर झाली आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती आणखीन बिघडून हाताबाहेर जाऊ नये, म्हणून देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, देशात लशीकरणाशी निगडीत दररोजची आकडेवारी जाहीर केली जाईल, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी मंगळवारी म्हटलं होते.

ब्रिटनमध्ये सर्वात प्रथम कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला होता. हा स्ट्रेन नेहमीच्या कोरोना व्हायरसपेक्षा अधिक गतीने पसरतो. तो अधिक संसर्गजन्य आहे. हा स्ट्रेन आता इतर जगभरात देखील वेगाने पसरत आहे.

या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत १३ लाख लोकांना फायझर/बायोटेक तसेच ऑक्सफर्ड/एस्ट्राजेनेकाची लस दिली गेली आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान या लशीकरण मोहिमेस आणखी गती आणली जाईल. यामुळे सर्वाधिक संवेदनशील समूहामध्ये प्रत्येकी चार व्यक्तीमधील एका व्यक्तीमध्ये दोन ते तीन आठवड्यांच्या दरम्यानच कोरोनाशी लढण्याची चांगली प्रतिकार शक्ती निर्माण होईल. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर येईल. येणारे काही आठवडे आतापर्यंतचे कठीण आठवडे असतील मात्र माझा विश्वास आहे की आपण या संघर्षाच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. असेही त्यांनी सांगितले.