जीवघेणा ‘कोरोना’ व्हायरस भारतात धडकला, मुंबईत आढळले 2 संशयित, विमानतळावरील ‘वॉच’ वाढला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने चीनमध्ये दहशत पसरवली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आता पर्यंत 26 लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या येत असताना आता हा कोरोना व्हायरस भारतात येऊन धडकला आहे. मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचे दोन संशयित रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत या व्हायरसचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आता या दोन्ही संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याचे परिक्षण केले जात आहे. चीनमध्ये या व्हायरसने 26 जणांचा बळी घेतल्याचे सांगितले जात आहे. तर 830 लोक या व्हायरसने बाधित झाले आहेत.

चीनमध्ये वुहानसह 9 शहरांना बंद करण्यात आले आहे. वुहानमध्ये 700 पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

असे सांगितले जात आहे की मुंबईत आणि पुण्यात या व्हायरसचे बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतात आता या संदर्भात आवश्यक की खबरदारी घेण्याची तयारी सुरु झाली आहे. चीनमधून परतल्यानंतर आढळलेल्या बाधित रुग्णांना व्हायरसची लक्षणं दिसल्याचे सांगितले जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा –