Coronavirus : आता ‘जागतिक आरोग्य संघटने’नं केलं मान्य ! चीनच्या वुहानमधूनच पसरला ‘कोरोना’ व्हायरस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीसाठी कोण जबाबदार आहे, हा एक असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर जगातील प्रत्येक देशाला जाणून घ्यायचे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थेट चीनवर दोषारोप ठेवतात आणि जागतिक आरोग्य संघटनेवर टीका करत असतात. अमेरिकेबरोबरच इतर युरोपियन देशांनाही चीनच्या भूमिकेला नकार देता येणार नाही असे वाटते. दरम्यान, काही आंतरराष्ट्रीय मीडिया एजन्सीच्या मते, आता जागतिक आरोग्य संघटनेचा असा विश्वास आहे की वेट मार्केटचा यात हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, या विषयावर संशोधन करण्याची गरज आहे.

डब्ल्यूएचओने देखील कबूल केले, वुहान जबाबदार

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे खाद्य सुरक्षा ज्युनोटिक व्हायरस तज्ज्ञ डॉ. पीटर बेन अंब्रेक यांचे म्हणणे आहे की वुहानच्या बाजारपेठेची यात भूमिका आहे, हे स्पष्ट आहे परंतु यात अधिक काय भूमिका आहे? याबाबत अधिक संशोधन आवश्यक आहे. तसेच एक गोष्ट स्पष्ट आहे की हे शहर व्हायरसचे केंद्र होते. या शहरात, व्हायरस बाहेर कोठून आला आहे की मग या बाजारपेठेतून बाहेर गेला आहे, हा संशोधनाचा विषय आहे. व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी चीनने जानेवारीत वुहान मार्केट बंद केले होते.

अमेरिकेच्या आरोपांवर उत्तर देण्यास नकार

अमेरिकेच्या आरोपांवर उत्तर देण्यास पीटरने नकार दिला आहे. येथे हे समजून घेणे महत्वाचे आहे की अमेरिका सतत असे म्हणत आहे की कोरोना विषाणूचा जन्म चीनमध्ये झाला आणि तेथूनच त्याचा प्रसार झाला, याचा मजबूत पुरावा देखील त्यांच्याकडे आहे. पीटर म्हणतात की मर्स विषाणूचा जन्म उंटांपासून झाला होता, हे शोधण्यासाठी एक वर्ष लागला. 2012 मध्ये सौदी अरेबियामध्ये मर्स विषाणू आला आणि तो मध्य-पूर्वेमध्ये पसरला होता. तसेच ते म्हणतात की वेट मार्केटमध्ये नियम पाळणे, स्वच्छतेच्या सुविधा सुधारण्याचे काम करण्याची गरज आहे.