आता ‘कोरोना’ व्हायरसमुळं भारतावर ‘संकट’ ! 70 टक्क्यांपर्यंत वाढले ‘अत्यावश्यक’ औषधांचे दर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकोपानंतर आता जगातील दुसर्‍या सर्वात जास्त लोकसंख्येचा देश असलेल्या भारतात मोबाइल फोनपासून आवश्यक औषधांच्या दरामध्ये वाढ दिसून येत आहे. भारतात सर्वात जास्त वापरण्यात येत असलेल्या औषधांपैकी एक असलेल्या पॅरासिटामॉलच्या किमतीत 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर, बॅक्टिरियल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी वापरले जाणारे औषध एजिथ्रोमायसिन सुद्धा 70 टक्के महाग झाले आहे. फार्मा कंपनी नूर्वी उरवळश्रर चे चेअरमन पंकज पटेल यांनी ही माहिती दिली.

पटेल म्हणाले, जर पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत औषधांचा पुरवठा व्यवस्थित न केल्यास एप्रिल महिन्यात फार्मा इंडस्ट्रीला औषधांच्या मोठ्या कमतरतेला तोंड द्यावे लागेल.

मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरलाही मोठा दणका
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आतापर्यंत 1 हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आता जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला याचा धोका निर्माण झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसह आर्थिक मंदीला तोंड देणार्‍या भारतासाठी सुद्धा ही चिंताजनक स्थिती आहे. चीनमध्ये जाण्या-येण्यास प्रतिबंध लावण्यात आल्याने उत्पादन क्षेत्राला मोठा झटका बसला आहे. भारत कच्च्या मालापासून अनेक इंटरमिजिएट उत्पादनांसाठी चीनवर अवलंबून आहे. असे असताना चीनमधील कोरोनाच्या संकटामुळे भविष्यात भारतापुढील संकटे वाढू शकतात.

जगभरात जेनेरिक औषधे निर्यात करतो भारत
औषधे बनविण्यासाठी वापरण्यात येणार्‍या अनेक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे औषधे बनविण्यासाठी लागणार्‍या अनेक महत्वाच्या वस्तूंची येत्या काळात कमतरता भासू शकते. जगभरात सर्वात जास्त जेनेरिक औषधे भारतातूनच निर्यात होतात. अमेरिकन बाजारात वापर होणार्‍या एकुण औषधांपैकी एकुण 12 टक्के उत्पादन भारतात केले जाते. ही औषधे बनविण्यासाठी लागणार्‍या कच्च्या मालासाठी भरताला चीनवर अलवंबून रहावे लागते. परंतु, कोरोनामुळे केवळ औषधेच नव्हे तर अन्य उत्पादनांवरही परिणाम झाला आहे.

मोबाइल फोन उत्पादनावर परिणाम
भारतातील अनेक मोबाईल निर्मिती कंपन्यांना आता अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याबाबतीत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर परिस्थिती लवकर पूर्ववत झाली नाही तर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. सध्याची स्थिती पुढील दोन आठवडे कायम राहिल. मोबाइल मॅन्युफॅक्वचरसाठी वापरले जाणारे प्रिंटेड सर्किट बोर्ड, कॅमेरा मॉड्यूल, सेमी कंडक्टर्स, रजिस्टरर्ससह अनेक महत्वाच्या वस्तूंची कमतरता भासू शकते.

आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये भारताने 555 अरब डॉलरच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची आयात केली होती. एका सरकारी आकड्यानुसार मार्च 2018 पर्यंत भारतात सेल्युलर मोबाइल हँडसेटची उत्पादन संख्या वाढून वार्षिक 22.5 करोडपर्यंत पोहचली होती, जी 2015 पर्यंत 6 करोड यूनिट्सच होती.