Coronavirus : ‘कोविड -19 टास्क फोर्स’ गठीत, PM मोदींच्या भाषणातील ‘हे’ 14 प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्रालयाच्या नेतृत्वाखाली कोविड 19 इकॉनॉमिक टास्क फोर्स बनवण्यात येत असल्याचे जाहीर केलं. ही टास्क फोर्स, आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी उचलण्यात येणारी पावलं आणि त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी सुनिश्चित करेल, असं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
1) संपूर्ण जग मोठ्या संकटातून जात आहे

2) संकट टळलेलं नाही. प्रत्येक भारतीयाने सजग राहिले पाहिजे

3) आज 130 कोटी देशवासियांकडे काही मागण्यासाठी आलोय. मला तुमचा काही काळ हवाय

4) देशवासियांनी मला कधीही निराश केलं नाही. मी जेव्हा कधी काही मागितलं तेव्हा देशवासियांनी मला दिलंय

5) कोरोनावर अजूनही उपाय निघालेला नाही

6) संकल्प आणि संयम हेच कोरोनाला उत्तर

7) संयमाचा अर्थ गर्दी टाळणं, घराबाहेर पडणं टाळणं

8) नागरिकांनी सरकारच्या निर्देशांचं पालन करावं

9) ज्येष्ठ नागरिकांनी काही आठवडे घराबाहेर पडू नये

10) ऑफिसची कामं घरातूनच करण्याचा प्रयत्न करा

11) येत्या रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्युचं पालन करू

12) अत्यावश्यक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम करणं गरजेचं

13) देशामुळे देशाचं मोठं आर्थिक नुकसान

14) जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा थांबणार नाही. त्यामुळे नागरिकांनी वस्तूंची खरेदी अगोदर प्रमाणे सामान्य करावी. वस्तूंचा साठा करण्याची गरज नाही.