Coronavirus : मुंबईत वाढला धोका ! 24 तासांत आढळले 57 ‘कोरोना’बाधित नवे रुग्ण, मुंबईचा आकडा 490 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. तिथे लॉकडाऊन असून देखील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी तिथे 4 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात कोरोनाचे 57 नवे रुग्ण आढळले आहे. इतकेच नाही तर 150 संशयीत रुग्णांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुर्णपणे बरे झालेल्या 5 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

एकट्या मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 519 झाली आहे. तिथे कोरोना ग्रस्तांची संख्या जास्त असल्यामुळे येत्या काळात बीएमसीला अधिक कठोर पावले उचलावी लागणार आहे.

संपुर्ण देशामध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. गेल्या 24 तासात देशभरात 693 कोरोना रुग्ण सापडले आहे. त्याचबरोबर देशात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 109 वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातही कोरोनामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या 4 हजाराच्या पुढे गेली आहे. तर राज्यात आता 791 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

केंद्रिय आरोग्यमंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला दिसत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाचीही बैठक झाली. या बैठकीत पुढे काय करायचे यावर चर्चा झाली.