Coronavirus : बाजारात ‘कोरोना’चे बोगस किट आलं, CBI ने राज्य सरकारांना केलं ‘सावध’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जगभरात कोरोना व्हयरसचे संकट असताना आता केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) देशातील राज्यस्तरीय पोलिसांना बनावट कोविड 19 चाचणी किटबद्दल सतर्क केले आहे. या संदर्भात सीबीआयकडून इंटरपोलला सूचना देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात बनावट टेस्टिंग किटच्या विक्रीबद्दल इंटरपोलला माहिती देण्यात आली होती.

सीबीआयने म्हटले आहे की, इंटरपोलने बनावट किट गुप्तपणे आंतरराष्ट्रीय बाजारात आणल्याबद्दल 194 सदस्य देशांना सतर्क केले आहे. सीबीआय आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (इंटरपोल) यांच्या समन्वयाने कारवाईत गुंतली आहे आणि सर्व इंटरपोल संपर्क अधिकारी यांना त्यांच्या संबंधित पोलिसांना याबाबत सतर्क करण्यास सांगितले. इंटरपोलशी संबंधित बाबींबात सीबीआयशी संपर्क साधण्यासाठी आयएलओ (संपर्क अधिकारी) हा प्रत्येक राज्य पोलीस दलाचा प्रतिनियुक्त अधिकारी असतो.

दरम्यान, सुत्रांनी सांगितले की, इंटरपोल कम्युनिकेशन्समध्ये कोणत्याही भारतीय कंपनीचा किंवा पुरवठादाराचा उल्लेख नाही. सुत्रांनी आणखी माहिती देण्यास नकार दिला कारण अशी माहिती देशातील पोलीस दलाच्या अखत्यारित येणाऱ्या समाजकंटकांना सतर्क करू शकते. कोरोना चाचणी किट आयात करण्यासाठी भारत जास्त अवलंबून आहे. ऑनलाईन विक्री आणि बनावट औषधांची वैद्यकीय पुरवठा, रुग्णालयांना लक्ष्य करणाऱ्यांवर, वैद्यकीय पुरवठ्यासंबंधीची आर्थिक फसवणूक आणि बरेच काही यासह कोरोना व्हायरस साथीच्या रोगानंतर इंटरपोलने बऱ्याच आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.