Coronavirus : कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेला गेलेल्या पत्रकाराला ‘कोरोना’, मुलीकडून लागण

भोपाल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात पत्रकाराच्या टीम मधील एका पत्रकाराच्या मुलीला कोरोना संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. ही पत्रकाराची मुलगी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर खबरदारी म्हणून पत्रकार परिषदेत उपस्थित माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह सर्व पत्रकारांना क्वारंटाईन मध्ये जावे लागेल.

वास्तविक, भोपाळमधील कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत हजर झालेल्या पत्रकाराची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली. यामुळे संपर्कात येणाऱ्या सर्व पत्रकारांना क्वारंटाईनमध्ये जावे लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या युवतीचे वडील देखील कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या युवतीच्या क्लोज कॉन्टेक्ट मध्ये आलेल्या नोकरांची, कुटुंबातील सदस्यांची असे एकूण 10 जणांची सॅम्पल टेस्ट करण्यात आली आहे. ज्यात केवळ मुलीच्या वडिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत 1000 हून अधिक लोक उपस्थित होते. कोरोना विषाणू बाधित पत्रकार सीएम हाऊस आणि भाजपा कार्यालयातही गेले होते. त्याच वेळी, ते दोन चॅनेलवर देखील चर्चेला गेले होते,त्यापैकी एक चॅनेल पूर्णपणे लॉकडाऊन झाले आहे.

मध्य प्रदेशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 16 झाली आहे. त्यापैकी जबलपूरमधील 6, इंदूरमधील 5, भोपाळमधील 3 आणि ग्वाल्हेर आणि शिवपुरी येथील प्रत्येकी एक अशी नोंद झाली आहे.