‘कोरोना’मुळे पोलीस कर्मचाऱ्याचे निधन, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चौथा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  ठाण्यात चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारीचे शनिवारी (दि.4) कोरोनामुळे निधन झाले. ते 46 वर्षाचे होते. ठाणे पोलीस दलातील मृत्यूची संख्या 4 झाली असून पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लॉकडाऊनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या पोलीस दलातील कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे पोलीस दलात देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून शनिवारी दुपारी चितळसर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भिवंडी येथे राहणारे पोलीस नाईक यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. 25 जून रोजी त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना ठाण्यातील वेदांत रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले होते. 2 जुलै रोजी त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहेत. शनिवारी दुपारी त्यांना हृदय विकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्यत मालवली. ठाणे पोलीस दलात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चार झाली आहे.

ठाणे पोलीस दलात गुरुवारी एकाच दिवसात 35 कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. यामध्ये 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ठाणे पोलीस दलात कोरोना बाधित पोलिसांची संख्या 598 इतकी झाली आहे. यामध्ये 59 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like