Coronavirus : राजधानी दिल्लीत ‘कोरोना’चे 2505 नवे रुग्ण, बधितांचा आकडा 99 हजार पार, जाणून घ्या आकडेवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  रविवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 2505 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून एकूण आकडेवारी एक लाखांच्या जवळपास पोचली आहे. तर या साथीच्या आजारामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या वाढून 3067 इतकी झाली असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दिल्ली आरोग्य विभागाच्या बुलेटिननुसार, रविवारी राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 63 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की या साथीने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 3067 पर्यंत वाढली आहे. तर संक्रमणाची एकूण प्रकरण 99444 पर्यंत वाढली आहेत.

23 जून रोजी दिल्लीत सर्वाधिक 3947 प्रकरणांची नोंद झाली होती. एका दिवसाची ही सर्वाधिक संख्या होती. मात्र, गेल्या पाच दिवसांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आरोग्या विभागाच्या बुलेटिननुसार, आतापर्यंत 71339 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे किंवा त्यांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 25038 इतकी झाली आहे. आतापर्यंत 634504 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. शनिवार पर्यंत दिल्लीत प्रतिबंधित क्षेत्राची संख्या 456 आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like