Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 528 नवे पॉझिटिव्ह तर 28 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना संक्रमित रूग्ण आता मोठा प्रमाणावर बरे होत असल्याचं समोर येणार्‍या आकडेवारीवरून स्पष्ट होते. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 528 नवे पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनामुळं शहरातील 28 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याबाहेरील 11 जणांचा आज पुण्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळं पुणे शहरात तब्बल 3899 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरातील समाधानाची बाब म्हणजे तब्बल 1413 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 55 हजार 595 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात चांगली आणि समाधानकारक बाब म्हणजे तब्बल 1 लाख 40 हजार 863 रूग्ण हे बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 10 हजार 833 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 839 जण हे क्रिटिकल असून त्यापैकी 453 जणांना व्हेंटिलेटरवरून उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाचा व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.