Coronavirus : पुणे जिल्हयात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 966 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हयाची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे विभागातील 5 लाख 1 हजार 266 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 30 हजार 983 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 797 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 920 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.40 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 39 हजार 562 रुग्णांपैकी 3 लाख 20 हजार 418 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 883 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 261 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.36 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 529 रुग्णांपैकी 48 हजार 78 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 748 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 703 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 226 रुग्णांपैकी 41 हजार 428 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 211 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 587 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 674 रुग्णांपैकी 44 हजार 506 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 475 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 693 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 992 रुग्णांपैकी 46 हजार 836 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 480 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1446 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 966, सातारा जिल्ह्यात 178, सोलापूर जिल्ह्यात 223, सांगली जिल्ह्यात 53 तर कोल्हापूर जिल्ह्यात 26 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1468 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 725, सातारा जिल्हयामध्ये 583, सोलापूर जिल्हयामध्ये 103, सांगली जिल्हयामध्ये 17 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 40 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 460 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 30 हजार 983 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )