COVID-19 : श्वास सोडल्याच्या एक तासानंतर देखील हवेत राहू शकतो कोरोना व्हायरस – एक्सपर्ट

नवी दिल्ली : वृत्त संस्था – ब्रिटनच्या इंपेरियल कॉलेज लंडनच्या प्रोफेसर वेंडी बार्कली यांनी म्हटले की, श्वास सोडण्याच्या एका तासानंतर सुद्धा कोरोना व्हायरस हवेत राहू शकतो. यासंबंधीचे पुरावे लागोपाठ मिळत आहेत. कोरोनो व्हायरस कोणत्याही वस्तूच्या पृष्ठभागावरून तसेच हवेतून सुद्धा संसर्ग पसरवू शकतो.

बीबीसीच्या एका शोमध्ये प्रोफेसर वेंडी बार्कली यांनी म्हटले की, आपल्याला हे माहितीच आहे की, कोरोना व्हायरसच्या अतिशय छोट्या ड्रॉपलेटमध्ये सुद्धा संसर्ग परसवण्याची क्षमता असते. याच कारणामुळे शंका निर्माण झाली आहे की, लोकांना हवेतूनही संसर्ग होऊ शकतो.

प्रोफेसरने म्हटले की, लॅबमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात समजले की, कोरोना व्हायरस हवेमध्ये एक तासापेक्षा जास्त वेळ टिकू शकतो. यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा म्हटले होते की, हवेतून कोरोना व्हायरस पसरण्याची थेअरी नाकारता येणार नाही.

मात्र, डब्ल्यूएचओने असेही म्हटले की, सामान्यपणे कोरोना व्हायरस नाक आणि तोंडातून बाहेर आलेल्या व्हायरसच्या संपर्कात आल्याने पसरतो. शिंकणे आणि कफद्वारे सुद्धा व्हायरस पसरतो, तसेच संक्रमित व्यक्तीसोबत बोलत असताना सुद्धा व्हायरस बाहेर येऊ शकतो.

विशेषता बंद खोलीत, जेथे बाहेरून हवा आत येऊ शकत नाही, अशा वातावरणातील हवेतून कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असल्याचे म्हटले जात आहे. काही तज्ज्ञ हे देखील सांगतात की, जर एखाद्या खोलीत संक्रमित व्यक्ती उपस्थित असेल तर तेथील एसीद्वारे सुद्धा संसर्ग पसरू शकतो.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like