‘… अन्यथा भारतातील ‘कोरोना’ रुग्णांची संख्या 36 ते 70 लाखांवर गेली असती’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने देशव्यापी लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे देशातील जवळपास 1.2 ते 2.1 लाख लोकांचा जीव वाचला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. बोस्टन कान्सल्टिंग ग्रुपच्या मॉडेलनुसार लॉकडाऊन जाहीर केला नसता तर देशातील कोरोना रुग्णांची संख्या 36 ते 70 लाखांवर गेली असती अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी आकेडवारीतून लॉकडाऊन किती प्रभावी ठरला हे दिसून येत असल्याचे म्हटले आहे.

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने लॉकडाऊन किती प्रभावी ठरला हे पाहण्यासाठी दोन अंदाज मांडले आहेत. त्यानुसार लॉकडाऊनमुळे 36 ते 70 लाख लोक कोरोनाची लागण होण्यापासून बचावले आहेत. तर 1.2 लाख ते 2.1 लाख लोकांचा जीव वाचला आहे. तर पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियानुसार 78 हजार लोकांचा जीव वाचला आहे. तर एमके अँड एसआर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 23 लाख लोकांचा कोरोनापासून बचाव झाला असून 68 हजार लोकांचा जीव वाचला आहे.

प्रवीण श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही जे मॉडेल आत्मसात केलं आहे. त्यानुसार लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने 14 ते 29 लाख लोकांना कोरोनापासून दूर ठेण्यात यश मिळवलं आहे. 37 ते 78 हजार लोकांचा जीव वाचला असल्याचे त्यांनी सांगितले.

एम्पावर्ड ग्रुपचे चेअरमन व्ही.के. पॉल यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे आपण तीन गोष्टी मिळवल्या आहेत. मृतांची संख्या, कोरोना रुग्णांची संख्या तर कोरोनाचा फैलाव करणाऱ्यांची संख्या रोखण्यात लॉकडाऊनमुळे यश आलं आहे. भारतात सध्या कोरोनाचे 1 लाख 18 हजार 447 रुग्ण असून 3583 जणांचा मृत्यू झाला आहे.