Coronavirus : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधार, ‘कोरोना’चा धोका टळला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाची बाधा झाल्यानंतर कालपासून अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती सुधारली आहे. त्यांना सोमवारी (6 एप्रिल) रोजी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. बोरिस जॉन्सन यांना 10 दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधार झाली असून, स्थिर असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सध्या ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले असले तरी, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी बोरिस यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली होती. मुख्य म्हणजे पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पंतप्रधानांच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडून रुग्णालयात दाखल झाले. आता त्यांनी यासाठी परराष्ट्रमंत्री डोमॅनिक रॉब यांना पंतप्रधानपदाची कामे पार पाडण्यासाठी नियुक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीबाबत ट्विट केले होते. मोदींनी, ’पंतप्रधान बोरिस जॉन्सन निश्चिंत राहा. मला आशा आहे की, तुम्ही लवकरच बरे व्हाल’, असे ट्वीट केले. पंतप्रधान मोदी मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांशी सतत संपर्कात असतात आणि कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात समर्थन देत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like