Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसवरून संपुर्ण जगानं चीनला ‘घेरलं’, पडला ‘वेगळा’

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस मूळे जगभरातुन चीनने रोष ओढावून घेतला आहे. चीनने जाणूनबुजून कोरोना व्हायरसची निर्मिती केल्याचा चर्चांना आता चांगलेच उधाण आले आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला खडे बोल सुनावले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले जर खरच चीनने एका विशिष्ठ हेतूने जर का या कोरोना विषाणुची निर्मिती केली असेल तसेच हे सिद्ध झाल्यावर चीनला याचे गंभीर परिणाम भोगायला लागतील. तसेच आस्ट्रेलिया या देशाने देखील कोरोना व्हायरस उत्पत्ती विषयी खरे खोटे करण्यासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर याची शहानिशा करण्याची मागणी केली आहे.

जगभर कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोना सारख्या संकटाशी लढता लढता अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या आहेत. त्यामुळेच अनेक देशांच्या मनात चीनविषयी रोष वाढत आहे. अनेक राजकीय अभ्यासकांच्या मते चीनचे इतर देशांशी असलेले संबंध बिघडले आहेत. जगभरात चीनविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि त्यामुळेच चीन हा वेगळा पडेल . कोरोना व्हायरसच्या उत्पत्ती वरून जगभरात उलटसुलट प्रश्न चीनविषयी उभे राहत आहेत.