Coronavirus : ‘कोरोना’विरूध्द लढताना चीननं लढविली अनोखी ‘शक्कल’, ‘पटकन’ बरे झाले हजोरा रूग्ण

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – चीनमधून जगभरात पसरणाऱ्या कोरोना संसर्गाने आतपर्यंत १० लाखांवर लोकांना आपल्या विळख्यात घेतले आहे. तर ५० हजारांहून अधिक संसर्गित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला लढण्यासाठी प्रत्येक देश आपल्या परीने काम करत आहे. यात कोरोनाची लस शोधण्यासाठी जगातील सर्व संशोधक प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोरोनाला हरविण्यासाठी चीनने शॉर्टकट शोधला आहे.

यासाठी चीनच्या शास्त्रज्ञांनी एक अँटीबॉडीज तयार केली असून ही अँटीबॉडीज कोरोनाला सर्वात प्रभावी उपचार असल्याने यामुळे चीनने हजारो रुग्णांना बरे केल्याचा दावा चीनने केला आहे. कोरोनाचा विषाणू हा केवळ रक्तातल्या पेशींमध्ये प्रवेश करून हल्ला करतो मात्र हे अँटीबॉडीज या विषाणूला पेशींमध्ये प्रवेश करून देत नाही. यामुळे हा विषाणू संपूर्ण शरीरात पसरू शकत नसल्याचे मत वैज्ञानिक झांग लिनकीच्या यांनी मांडले.

तसेच कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी चीनच्या शास्त्रज्ञांनी २० अँटीबॉडीज ची ओळख करून दिली आहे. यामध्ये चार अँटीबॉडीज या कोरोनाविरुद्ध प्रभावी पणे काम करत असल्याचे दिसून आले. चीनच्या वुहान शहरातील एका महिलेपासून कोरोनाचा जगभर प्रसार झाला यामध्ये चीनचे ८२ हजार ४३७ लोकांना संसर्गाची लागणं झाली तर ३ हजार ३२२ लोकांनाच मृत्यू झाला आहे. तर चीनने आतापर्यंत ७६ हजार ५६६ लोकांवरती उपचार केले आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाला जीनोम क्रमानुसार संपुष्टात आणण्यासाठी लस शोधत आहे. मात्र चीनी शास्त्रज्ञांनी याउलट जाऊन हा विषाणू कसा पसरतो याबाबत शोध घेतला आहे.