Coronavirus : मुख्यमंत्री ठाकरे यांनी कलम 144 लागू करण्याची घोषणा केल्यानंतर सांगितल्या ‘या’ 7 महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या (सोमवार) सकाळपासून 144 कलमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. पुढे ते म्हणाले, या रोगाच्या प्रदुर्भावाचा काळ आहे. त्यातल्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात पाऊल टाकलेलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. ही संख्या लवकरात लवकर थांबवायची आहे.

उद्या सकाळपासून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरच नाही तर महाराष्ट्रातल्या नागरी भागात 144 कलम नाइलाजास्तव लावत आहे. कृपा करून 5 पेक्षा अधिक जण एकत्र येऊ नका. गर्दी करू नका, टोळकं किंवा ग्रुपनं कुठंही फिरू नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. परदेशातून आता आपल्याकडे कोणी येणार नाही. आता आपले आपणच आहोत. आपल्यालाच या संकटावरती मात करायची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे

  1. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन
  2. शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करा
  3. फक्त 5 टक्के कर्मचारी बाहेर काम करतील. 5 टक्के कर्मचारी संपूर्ण राज्याचा भार वाहतील
  4. किमान पुढच्या 31 मार्चपर्यंत या नियमाचं पालन करा. जनता कर्फ्यू उद्या पहाटेपर्यंत राहणार
  5. 31 मार्चपर्यंत खासगी बस, एसटी बस, रेल्वे बंद राहणार, बस सेवा फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु
  6. या रोगानं कोणाचाही माग सोडलेला नाही. सगळ्या देशाला या रोगाने वेढलं आहे. त्यामुळे कोणी माणूसकी सोडू नका, सगळ्यांनी एकत्र येत सामना करूया.
  7. घरकामांना किमान वेतन सुरु ठेवा, कंपन्यांनी कामगारांना किमान वेत द्यावं