Coronavirus : आम्ही कधीच नाही सुधरणार ! चीननं मदत म्हणून पाठवलेली कोरोनाच्या टेस्टिंगचे किट ‘निकृष्ट’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चीनमधून जन्म घेतलेल्या कोरोना संसर्गाचे जगभरात आतापर्यंत ७ लाखांच्या वर रुग्ण आहे. मात्र चीन यामधून आता सावरत आहे. चीनने कोरोना संसर्गाने अडचणीत सापडलेल्या देशांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. पण चीनचे हे रूप खोटारडे असल्याचे कळत आहे. कोरोनामुळे आरोग्यसेवेचे तीन तेरा झालेल्या युरोपमधील अनेक देशांना चीनने पाठवलेले टेस्टिंग किट्स हे निष्कृष्ट दर्जाचे समोर आले आहे. त्यामुळे चीनने केलेल्या मदतीबाबत शंका उपस्थित होत आहे.

दरम्यान, युरोपमधील स्पेन आणि झेक या देशांनी चीनमधून आलेले हे किट्स निष्कृष्ट असल्याने या टेस्टिंग किट्स चा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनाने युरोपमध्ये थैमान घातले असून, कोरोनामुळे इटलीत १० हजार हुन अधिक, तर स्पेनमध्ये ६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे युरोपमधील आरोग्यव्यवस्था अक्षरशः कोलमडून गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीनकडून युरोपीयन देशांना पुढे केलेे आहे. पण, निष्कृष्ट किट्स मुळे चीनच्या हेतूबाबत संशय निर्माण झालाय.

या टेस्टिंग कीट्सची आयात चीनमधून केली नसल्याचे चीनच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, स्पेनने या किट्स ची खरेदी एका पुरवठादाराकडून खरेदी केले होते. पुरवठादाराने हे किट्स चीनमधील एका कंपनी मार्फत आयात केल्याचे कळत आहे. दरम्यान, यूरोपीय महासंघाचे कडक निकष असताना या किट्स आल्या कशा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.