कोरोनाचा सर्वात मोठा विध्वंस! एका दिवसात पहिल्यांदाच 2 हजार मृत्यू आणि सुमारे 3 लाख नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या कुठं कशी स्थिती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. दररोज विक्रमी आकडे समोर येत आहेत. परंतु यावेळेस कोरोनाने होणार्‍या मृत्यूंनी सुद्धा आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत देशात पहिल्यांदाच जवळपास 3 लाख केस समोर आल्या आहेत आणि सर्वाधिक 2000 मृत्यू झाले आहेत. अशाप्रकारे महामारीची दुसरी लाट प्रत्येक दिवशी आपलाच विक्रम मोडत आहे. मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासात देशात 2020 कोरोना रूणांचा मृत्यू झाला. ही महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसातील कोरोना संक्रमितांच्या मृतांची सर्वाधिक संख्या आहे. पहिल्यांदा देशात एका दिवसात 2 हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आकड्यांनुसार, या कालावधीत मंगळवारी 2,94,115 कोरोना व्हायरसचे संक्रमित रूग्ण सापडले. ही देशातील एका दिवसात सापडलेल्या एकुण नव्या संक्रमितांची सर्वाधिक संख्या आहे. लागोपाठ 5 दिवसांपासून विक्रमी मृत्यू नोंदले जात आहेत. ही माहामारीच्या सुरूवातीपासून आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. महामारीने मरणार्‍या एकुण संक्रमितांची संख्या वाढून 1,82,570 झाली आहे, तर आतापर्यंत एकुण संक्रमित झालेल्या लोकांची संख्या 1,56,09,004 आहे. देशात उपचाराधीन रूग्णांची संख्या 21,50,119 वर पोहचली आहे. ही एकुण संक्रमितांच्या संख्येच्या 13.8 टक्के आहे.

आठवडाभरात मृतांमध्ये साडे 94 % वाढ
तारीख (एप्रिल महिन्यात) कोरोना रूग्णांचा मृत्यू

21                    2020
20                     1761
19                    1620
18                     1498
17                      1338
16                    1184
15                    1038

संसर्ग जास्त असणारी प्रमुख पाच राज्य
राज्य                 संक्रमण दर (टक्के)
महाराष्ट्र                 16.3
गोवा                 11.6
नागालँड                 9
केरळ                 8.8
छत्तीसगढ                 8.5
भारत                 5.8

बरे होण्याचा दर कमी होऊन 85 टक्के झाला :
कोरोना संक्रमित लोक बरे होण्याचा दर घसरून 85 टक्के झाला आहे. आकड्यांनुसार, या आजारातून बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढून 1,32,69,863 झाली आहे. कोरोनाने राष्ट्रीय स्तरावर मृत्यूदर घसरून 1.20 टक्के झाला आहे, परंतु महाराष्ट्रात हा दर 1.5 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये 1.6 टक्के आहे.

77 टक्के मृत्यू केवळ 8 राज्यांत :
देशात 24 तासांदरम्यान सर्वाधिक 519 लोकांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. यानंतर दिल्लीत 277, छत्तीसगढमध्ये 191, युपीत 162,  गुजरात 121, कर्नाटकमध्ये 149, पंजाबमध्ये 60 आणि मध्य प्रदेशात 77 लोकांचा मृत्यू झाला. या 8 राज्यांत एकुण 1556 मृत्यू झाले जे एकुण 2020 मृत्यूंच्या 77.02 टक्के आहेत.

60 टक्के नवीन संक्रमित केवळ 6 राज्यांत :

महाराष्ट्रात सर्वाधिक 62,097 नवीन संक्रमित रूग्ण आढळले. यानंतर उत्तर प्रदेशात 29574, दिल्लीत 28395, कर्नाटकमध्ये 21794, केरळमध्ये 19577 आणि छत्तीसगढमध्ये 15625 नवे कोरोना रूग्ण मिळाले.