गृह मंत्रालयानं कोरोनाच्या सध्याच्या गाइडलाइन्सला 30 जुनपर्यंत वाढवलं, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली : वृत्त संस्था – गृह मंत्रालया (Ministry of Home Affairs) नं कोरोनाच्या सध्याच्या गाइडलाइन्सला 30 जुनपर्यंत वाढवलं देशातील बहुतांश राज्यात लावलेल्या लॉकडाऊनसारख्या प्रतिबंधांमुळे कोरोनाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. दिल्ली, युपी, महाराष्ट्र, हरियाणा, मध्यप्रदेशसह अनेक राज्यात कोरोनाच्या प्रकरणात मोठी घट नोंदली गेली आहे. दिल्लीत तर मागील काळात 35 टक्केच्या पुढे गेलेला पॉझिटिव्हिटी रेट आता 2 टक्केच्या खाली आला आहे. या दरम्यान, केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 ची सध्याची मार्गदर्शक तत्वे 30 जूनपर्यंत जारी ठेवण्याचा आदेश दिला आहे.

गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रकरणांची संख्या जास्त आहे, तिथे स्थानिक स्तरावर नियंत्रणाचे उपाय केले जावेत. एका नव्या आदेशात, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी म्हटले की, नियंत्रणाचे उपाय सक्तीने लागू करण्याने दक्षिण आणि पूर्वोत्तरचा काही भाग सोडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन आणि उपचाराधीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे.

Rajasthan News Live Updates : जयपुरमध्ये विषारी गॅसची गळती, अनेक कॉलनी रिकाम्या केल्या, लोकांची बिघडली तब्येत

 

भल्ला यांनी म्हटले, मला हे सांगायचे आहे की, घसरणीची प्रवृत्ती असूनही, सध्या उपचाराधीन प्रकरणांची संख्या अजूनही खुप जास्त आहे. म्हणून हे महत्वाचे आहे की, नियंत्रणाचे उपाय सक्तीने लागू ठेवले जावे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी जारी केलेल्या आपल्या आदेशात केंद्रीय गृह सचिवांनी म्हटले आहे की, स्थानिक स्थिती, गरजा आणि स्त्रोतांचे आकलन केल्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश योग्यवेळी टप्प्या-टप्प्याने प्रतिबंधांमध्ये सूट देण्यावर विचार करू शकतात.

त्यांनी म्हटले की, मे महिन्यासाठी 29 एप्रिल रोजी जारी मार्गदर्शक तत्त्वे 30 जूनपर्यंत लागू राहतील. त्यानुसार, गृह मंत्रालयाने राज्यांना म्हटले की, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, अ‍ॅम्बुलन्सची योग्य उपलब्धता करण्यासाठी आवश्यक कारवाई करा आणि गरज भासल्यास अस्थायी हॉस्पिटलची निर्मिती करा. यासोबतच पुरेशी विलगिकरण केंद्र तयार ठेवा.

Pune : ATM सेंटरमध्ये विशिष्ट डिव्हाईस बसवून त्याद्वारे बॅंकेची यंत्रणा हॅककरून फसवणूक; दोघा नायजेरियन तरुणांना पुण्याच्या सायबर गुन्हे शाखेकडून अटक

 

Best Type Of Banana For Weight Loss : लाख प्रयत्नानंतर सुद्धा लठ्ठपणा कमी होत नाही का? करा ‘या’ रंगाच्या केळीचं सेवन

 

तुमच्या पाठीवर सुद्धा आहेत का मुरुम ? सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती उपाय, ‘ही’ 8 कारणे जाणून घ्या

शिल्पा शेट्टी च्या ‘या’ ड्रिंकमध्ये लपलंय पोटाच्या प्रत्येक समस्येचं समाधान, ‘फॅट बर्न’ करण्यासाठी होईल मदत, जाणून घ्या