Coronavirus : ‘कोरोना’सह इतर संसर्गजन्य रोगांपासून वाचण्यासाठी ‘हे’ 4 उत्तम पर्याय, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – हिंदू धर्मानुसार वेदांना जीवनाचा आधार मानण्यात आले आहे. सृष्टीच्या आरंभापासून ते अंतपर्यंत सर्व गोष्टी वेदांमध्ये सांगितल्या आहेत. आयुर्वेदात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती, जडी बुटी आणि मंत्रांचा उल्लेख आढळतो. याचा वापर केल्यास गंभीर रोगांवरही मात करता येऊ शकते. सध्या जगावर कोरोनाचे सावट आहे.

मुंबई, पुण्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण देखील आढळले आहेत. त्यामुळे लोक घाबरले आहेत. ज्योतिष आणि आयुर्वेदातील काही उपायामुळे संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

1 . कापूर –
आपल्या धर्मग्रंथात कापूर अत्यंत शुद्ध मानला जातो. असे असले तरी आताच्या घडीला कापूर रसायनांनी तयार केला जातो. नैसर्गिक कापूर झाडांपासून प्राप्त होतो. ज्योतिष शास्त्रात कापराचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. राहू, केतू, शनी या ग्रहांचा संबंध रहस्यमयी रोग आणि विषाणुंशी जोडण्यात आला आहे. कापूर प्रज्वलित केल्याने ग्रह शांत होतात. काही ग्रंथात शुक्र ग्रह हा केतुचा गुरु मानला जातो. म्हणून शुक्र प्रबळ झाल्याने राहु – केतूंचा प्रभाव कमी होतो. आयुर्वेद आणि ज्योतिषानुसार ज्या घरांमध्ये नियमित कापूरयुक्त धूप प्रज्वलित केला जातो. तेथे अनेक प्रकारचे रोगाणू, विषाणू शांत होतात. त्यांचा प्रभाव कमी होतो म्हणूनच प्राचीन काळापासून होम – हवन, यज्ञ, पूजाविधी यात कापूर प्रज्वलन केले जाते. कापराच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होते.

2 धूप
राहू, केतू आणि शनी या ग्रहांचे प्राबल्य वाढल्यामुळे अनेक रोगाणू, विषाणुंचा प्रादुर्भाव तीव्र होतो अशी मान्यता ज्योतिषात आहे. घरात नियमित धूप प्रज्वलित केल्याने रोगाणू, विषाणू नष्ट होतात असे सांगितले जाते. यात लोबान, कापूर आणि आयुर्वेदात सांगितलेल्या उपयुक्त गोष्टींचा वापर केल्यास त्याची परिणामकारकता वाढते. धूपाच्या धुरामुळे घरातील विषाणु नष्ट होतात. त्यामुळे कुटूंबीयांवरील प्रभावाचे प्रमाण नगण्य होते. लोबानमध्ये अनेक रोगांचे शमन करण्याची ताकद असते. तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते असे सांगण्यात येते.

3. जटामांसी –
मंगळ ग्रहाचा संसर्गजन्य रोगाशी संबंध असल्याचे ज्योतिष सांगते. सद्यस्थितीत मंगळ आणि शनी ग्रहाची स्थिती ही फार शुभफलदायक नाही. शनी ग्रह मकर राशीत आल्यावर नेहमी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते असे सांगण्यात येते. 22 मार्चला शनी आणि मंगळ ग्रह मकर राशीत जात आहे. या संयोगामुळे जागतिक स्तरावर अनेक देशांना नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. मंगळ ग्रहाचा नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी जटामांसी लोबानसह प्रज्वलित करणे फायदेशीर ठरते. हिमालतयात जटामांसी नावाची वनस्पती आढळून येते. हीच औषधी गुणधर्म महत्वाची असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, रोगाणू वातावरणात नष्ट करण्याची क्षमता यामध्ये असून, हृद्य आणि मस्तकाशी संबंधित रोगमुक्तीसाठी या औषधी वनस्पतीचा वापर केला जातो.

4. लसूण –
धार्मिक मान्यतेनुसार, लसूण आणि कांद्याचे सेवन व्रतावेळी वज्र मानले जाते. मात्र लसून नियमित खाल्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. अनेक रोगांपासून बचाव करण्यासाठी लसूण आणि कांदा खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदात अनेक औषधी आहेत ज्यांच्या वापरणाने आपणा आपले शरीर आणि वातावरण रोगमुक्त ठेवू शकतो. तर वैदिक मंत्र आणि उपचारांमुळे घरातील वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होते.