Coronavirus Impact : ‘कोरोना’नं रोखली जेम्स बाँडची रिलीज, ‘या’ बड्या हॉलिवूडपटांची प्रतिक्षा वाढली !

पोलिसनामा ऑनलाइन –कोरोनाचा प्रभाव जगभर पहायला मिळत आहे. हॉलिवूडमधील कल्ट क्सासिक जासूस जेम्स बाँडलाही रिलीजसाठी वाट पहावी लागत आहे. हॉलिवूडमधील अनेक बड्या फ्रेंचायजीचे सिनेमे आता सिनेमा हॉल उघडण्याची वाट पहात आहेत.

1) जेम्स बाँड नो टाईम टू डाय- डॅनियल क्रेग जेम्स बाँड म्हणून आपला शेवटचा सिनेमा करत आहेत. मेमध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोनाचं संकट मार्चमध्ये आलं तेव्हाची याची रिलीज नोव्हेंबरपर्यंत ढकलण्यात आली. चीनमध्ये या सिनेमांचा चांगला बिजनेस होतो.

2) मिशन इम्पॉसिबल- टॉम क्रूजच्या अॅक्शन पॅकमधील मिशन इम्पॉसिबल मधील सातवा सिनेमा येणार आहे. हा सिनेमा आता जुलै 2021 मध्ये रिलाज केला जाणार आहे. इटलीत सिनेमाची शुटींग सुरू होती परंतु कोरोनामुळं ती थांबवण्यात आली होती.

3) ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन- ज्युरासिक वर्ल्ड फ्रेंचायजीचा आगामी सिनेमा ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियनचं प्रॉडक्शन सुरू होतं. परंतु कोरोनामुळं तेही थांबवण्यात आलं आहे. आता हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज केला जाणार आहे.

4) फास्ट अँड फ्युरियस- हा या फ्रेंचायजीचा 9 वा सिनेमा आहे. यावेळी यात WWE रेरलर जॉन सीनाही असणार आहे. 22 मे रोजी हा सिनेमा रिलीजा केला जाणार होता. परंतु कोरोनामुळं हा सिनेमा पुढील वर्षी एप्रिलमध्ये रिलीज केला जाणार आहे.