‘कोरोना’च्या संकटात आता आपल्याच या कर्मचार्‍यांची भीती वाटतेय भारतीय कंपन्यांना ! त्यामुळं मागितले जातायेत ‘हे’ डिटेल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसमुळे बरेच मोठे बदल झाले आहेत. आता कंपन्यांची बोर्ड बैठक व्हर्चुअल पद्धतीने होत आहे, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे. पण कंपन्यांसाठी ही सर्वात मोठी अडचण बनली आहे. कारण बोर्ड मीटिंगचे निर्णय कोणत्याही कंपनीसाठी अत्यंत संवेदनशील असून ते लीक होण्याची शक्यता वाढली आहे. बोर्डाच्या बैठकीशी संबंधित बाबी फक्त त्या बैठकीत उपस्थित असलेल्या लोकांनाच माहित असत. तसेच कंपनीतील अन्य काही मोठ्या अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती होत असत.

कंपन्यांवर होऊ शकते कडक कारवाई
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बोर्ड बैठकीचे निर्णय कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. हे केवळ संवेदनशील माहितीपुरते मर्यादित नाही, तर त्यात कंपनीच्या नियम व रणनीतीसह भविष्यातील योजनांसंबंधित पावलेदेखील आहेत. सूचीबद्ध कंपन्यांसाठी ही मोठी समस्या असू शकते, ज्यामुळे शेअर बाजार नियामक सेबी त्यांच्यावर कारवाई करू शकते.

आपल्या आयटी स्टाफला घाबरत आहेत कंपन्या ?
एका वृत्तसंस्थेनुसार, कोरोनाच्या या संकटात जेव्हा बोर्ड बैठक व्हर्चुअल पद्धतीने घेतली जात आहे, तेव्हा आयटी कर्मचार्‍यांचा पाठिंबा यात महत्त्वपूर्ण ठरत आहे. यानंतर अशा बोर्ड बैठकीत होणारी संवेदनशील माहिती लीक होण्याचा धोका वाढला आहे. अलीकडेच देशातील एका मोठ्या पेंट मेकिंग कंपनीने आपल्या आयटी टीमच्या ३५ कर्मचार्‍यांना स्टॉक मार्केटमध्ये स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या गुंतवणूकीबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे.

या कंपनीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या कंप्लायन्स टीमने सूचित केले आहे की, आयटी विभागातील कर्मचार्‍यांची आमच्या संवेदनशील माहितीपर्यंत पोहोच असते. त्या अनुषंगाने त्याला इनसाइडर ट्रेडिंगच्या नियमांबद्दल जागरूक केले पाहिजे आणि ते इनसाइडर ट्रेडिंगमध्ये सहभागी नसल्याचे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जावे. कंपनीच्या सर्व संचालकांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या माहितीचा बॅकअप आयटी स्टाफकडे असतो आणि त्यांना हवे तर अशी माहिती सहज लीक होऊ शकते.

मात्र प्रक्रियेत एखादी संवेदनशील माहिती लीक झाली, तर त्यात कोण सामील होते हे शोधणे कठीण आहे.
कार्यालयातील आयटी विभागाकडे व्हिडिओ बैठकीतील माहिती असते. आता कंपन्या याविषयी जागरूक होत आहेत आणि त्यांच्या आयटी कर्मचार्‍यांना इनसाइडर ट्रेडिंगच्या नियमांचे पालन करण्यास सांगत आहेत आणि त्यानुसार काम करण्यास सांगत आहेत, जेणेकरून अशा प्रकारची संवेदनशील माहिती कोणत्याही परिस्थितीत लीक होऊ नये.