Coronavirus : चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे विक्रमी 3752 नवे पॉझिटिव्ह तर 100 जणांचा बळी, बाधितांचा आकडा 1 लाख 20 हजार पार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता अधिकच वाढत आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून तीन हजाराच्या वर कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आज राज्यात विक्रमी कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेल्या 24 तासामध्ये तब्बल 3752 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 20 हजार 504 इतकी झाली आहे.

 

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 100 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 हजार 751 एवढी झाली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यामध्ये 1672 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्य़ंत राज्यात 60 हजार 838 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

राज्यात 3752 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 120504 एवढी झाली आहे. यामध्ये 53 हजार 901 रुग्ण हे अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. राज्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या चिताजनक आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्वोतोपरी उपाय योजना करत आहेत.