Coronavirus : देशात ‘कोरोना’चे 4.2 लाख सक्रिय रुग्ण तर मृत्यूचा आकडा 28 हजारांच्या पुढं, गेल्या 24 तासात 37 हजाराहून जास्त नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे. देशात आता कोरोना रूग्णांची संख्या 11.55 लाख झाली आहे. आता तर रोज सुमारे 35-40 हजार केस येऊ लागल्या आहेत. मागील 24 तासात 37140 रूग्ण सापडले आहेत. यापूर्वी रविवारी विक्रमी 40 हजार 425 आणि 18 जुलैला 37 हजार 407 रूग्ण सापडले होते. एका दिवसात 587 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाने मरणार्‍यांची संख्या 28 हजारच्या पुढे गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अपडेटनुसार, कोरोनाच्या आता 4 लाख 2 हजार 529 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. या व्हायरसमुळे आतापर्यंत 28 हजार 84 लोकांचा जीव गेला आहे. दिलासादायक बाब ही आहे की, 7 लाख 24 हजार 577 रूग्ण रिकव्हर झाले आहेत.

देशाच्या एकुण केसपैकी 1.23 लाख केस एकट्या दिल्लीत आहेत. दिल्ली देशात सर्वात जास्त केसच्या बाबतीत तीसर्‍या आणि मृत्यूंच्या बाबतीत दूसर्‍या नंबरवर आहे. सर्वात जास्त केस महाराष्ट्रात (3.18 लाख) आहेत. तमिळनाडु 1.75 लाख केससह दुसर्‍या स्थानावर आहे.

महाराष्ट्रात स्थिती भयंकर
कोरोनाच्या सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह केस महाराष्ट्रात आहेत. सोमवारी राज्यात कोरोनाची 8240 नवी प्रकरणे समोर आली. तर 176 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनाच्या एकुण प्रकरणांची संख्या आता 3,18,695 झाली आहे. यामध्ये 1,75,029 रिकव्हर प्रकरणे आणि 1,31,334 सक्रिय प्रकरणांचा सहभाग आहे. मुंबईत कोरोनाची 1043 नवी प्रकरणे समोर आली आहेत. 965 डिस्चार्ज आणि 41 मृत्यू नोंदले गेले आहेत. 23865 सक्रिय प्रकरणे, 72,650 डिस्चार्ज आणि 5752 मृत्यूंसह प्रकरणांची एकुण संख्या 1,02,267 आहे.

दिल्लीत आता कमी होत आहेत केस
राजधानी दिल्लीत लागोपाठ केसची संख्या घटत आहे. दिल्लीत मागील 24 तासात 954 कसे आल्या. सुमारे 50 दिवसांनंतर ही पहिली वेळ आहे, जेव्हा दिल्लीत एक हजारपेक्षा कमी केस आल्या आहेत. विशेष बाब ही आहे की, दिल्लीत रोज सुमारे 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त टेस्ट होत आहेत.

युपी आणि आंध्र प्रदेशात रूग्णांचा आकडा 50 हजारच्या पुढे
उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये सोमवारी रूग्णांचा आकडा 50 हजारच्या पुढे गेला. युपीमध्ये मागील 24 तासात 1,913 नवे रूग्ण सापडले आहेत. येथे टेस्ट अतिशय कमी प्रमाणात होत असल्याने रूग्ण संख्या कमी दिसत आहे. येथे संक्रमितांची संख्या आता 51,160 झाली आहे. तर, आंध्र प्रदेशमध्ये सोमवारी 4,074 कोरोना संक्रमित सापडले. येथे आतापर्यंत 53,724 लोकांना संसर्ग झाला आहे.

अनेक देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी
एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी म्हटले की, इटली, स्पेन आणि अमेरिकेच्या तुलनेत मत्युदर दर खुप कमी आहे. काही परिसरात कोरोना पीकवर पोहचला आहे दिल्लीत सुद्धा असेच दिसत आहे. कारण, प्रकरणांमध्ये घसरण नोंदली जात आहे.

भारत हा अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वात प्रभावित देश
कोरोना संक्रमितांच्या संख्येच्या प्रमाणानुसार भारत हा अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वात जास्त प्रभावित देश आहे. जर प्रति 10 लाख लोकसंख्येवर संक्रमित प्रकरणे आणि मृत्युदराचा विचार केल्यास अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे. भारतापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका (3,896,855), ब्राझील (2,099,896) मध्ये आहेत. देशात कोरोना प्रकरणांचा वाढता वेगसुद्धा जगात दुसर्‍या नंबरवर आहे.