Corona Updates : देशात 24 तासात 4,329 कोरोना रुग्णांचा मृत्यू, सलग दुसर्‍या दिवशी 3 लाखापेक्षा कमी नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना संसर्गाच्या वेगाबाबत दिलासादायक बातमी आहे. देशात लागोपाठ दुसर्‍या दिवशी कोरोनाची तीन लाखापेक्षा कमी नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेटमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. मात्र, कोरोना महामारीने मृत्यू होण्याचे प्रमाण अजूनही थांबलेले नाही. मागील एका दिवसात 4300 पेक्षा जास्त कोविड रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील 24 तासात कोरोनाच्या 2.63 लाखापेक्षा जास्त नवीन केस समोर आल्या आहेत. तर 4.22 लाखापेक्षा जास्त कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. भारतात काही दिवसात पॉझिटिव्हिटी रेटच्या तुलनेत रिकव्हरी रेट वाढला आहे. तर मृत्यूंची संख्या अजूनपर्यंत कमी झालेली नाही. देशात आता कोरोनाच्या 33 लाखापेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे मंगळवारी सकाळी 8 वाजता जारी करण्यात आलेले कोरोना आकडे…

* मागील 24 तासात आल्या एकुण नवीन केस – 2,63,533
* मागील 24 तासात एकुण बरे झाले – 4,22,436
* मागील 24 तासात झालेले एकुण मृत्यू – 4,329
* देशात कोरोना संक्रमितांचा एकुण आकडा – 2,52,28,996
* देशात आतापर्यंत ठिक झालेले एकुण रूग्ण – 2,15,96,512
* देशात कोरोनाने मरणार्‍यांचा एकुण आकडा – 2,78,719
* भारतात कोरोनाच्या आता एकुण अ‍ॅक्टिव्ह केस – 33,53,765
* एकुण व्हॅक्सीनेशन – 18,44,53,149

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, 9 मेनंतर रोज नवीन प्रकरणांमध्ये सरासरी घसरण आली आहे. भारतात कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह प्रकरणात 75 टक्के रूग्ण कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात आणि छत्तीसगढमध्ये आहेत. देशात कोविड रूग्णांचा बरे होण्याचा राष्ट्रीय दर 85 टक्केपेक्षा जास्त आहे. तर कोरोनाने मृत्यूदर 1.10 टक्के आहे.

मागील 24 तासात सापडलेले नवीन रूग्ण आणि मृत्यू
* दिल्ली – 4524 – 340
* यूपी – 9391 – 285
* गुजरात – 7135 – 81
* कर्नाटक – 38603 – 476