Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 6107 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. नवीन रुग्णांची संख्या कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दिलासा मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 107 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळून आले आहेत. तर 16,035 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

 

राज्यात आजपर्यंत 75 लाख 73 हजार 069 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.89 टक्के झाले आहे. राज्यात आज 57 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 43 हजार 155 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.83 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 57 लाख 68 हजार 634 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यापैकी 78 लाख 16 हजार 243 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
सध्या 96 हजार 069 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 6 लाख 39 हजार 490 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 2412 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 6107 new patients in the last 24 hours in the state, learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा