Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,857 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात गेल्या 24 तासात एकूण 6 हजार 857 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान (Coronavirus in Maharashtra) झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. आज एकूण 6 हजार 105 इतके रुग्ण बरे (Coronavirus in Maharashtra) झाले आहेत. तसेच आज एकूण 286 रुग्णांचा मृत्यू (Death) झाला आहे, राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजच्या 286 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. याशिवाय राज्यात आतापर्यंत एकूण 60 लाख 64 हजार 856 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.53 टक्के एवढे झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (Active patient) संख्या 82 हजार 545 इतकी झाली आहे. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 73 लाख 757 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 82 हजार 914 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 294 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 347 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात कोरोना बाधित 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02.

– 224 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 486365.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2488.

– एकूण मृत्यू – 8749.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 475128.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 7930.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 221 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 227 रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 01 जणाचा मृत्यू

– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 264023.

– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 788.

– एकूण मृत्यू – 4338.

– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 258897.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4047.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | 6,857 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

IPS Officer । ‘संत मीराबाईप्रमाणे कृष्णभक्तीत तल्लीन व्हायचंय’, स्वेच्छानिवृत्तीसाठी महिला IPS अधिकाऱ्याचे DGP ला पत्र

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 221 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी