Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 2,968 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (गुरुवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज 1,573 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,968 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 64 लाख 30 हजार 394 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.46 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 39 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 925 रुग्णांचा मृत्यू (Coronavirus in Maharashtra) झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

 

सध्या राज्यात 24 हजार 292 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 14 लाख 94 हजार 090 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 98 हजार 218 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 01 हजार 162 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत तर 1007 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Comfortable! In the last 24 hours 2,968 patients in the state have been ‘corona free’, learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

State Bank of India | खुशखबर ! ‘या’ बँक ग्राहकांना घरबसल्या मिळणार 20 हजार रूपयांपर्यंत कॅश, जाणून घ्या काय आहे ही सर्व्हिस

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाला 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या आणखी एकाला गुन्हे शाखेकडून अटक

Gold Price Today | सोने अजूनही सर्वोच्च स्तरापासून 9697 रुपयांनी ‘स्वस्त’, पहा 1 तोळ्याचा नवीन दर