Coronavirus in Maharashtra | राज्यातील गेल्या 24 तासात 1361 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्या अटोक्यात आली आहे.  मागील तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हजाराच्या आत आली असून रुग्णांची संख्या घटल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात काल नव्या कोरोना बाधितांची (Coronavirus in Maharashtra) संख्या 893 होती. तर गेल्या 24 तासात 782 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचदरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आज 1 हजार 361 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 10 हजार 376 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.03 टक्के झाले आहे. राज्यात आज 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आज नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात इतर ठिकाणी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 78 लाख 24 हजार 854 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 65 हजार 298 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 7 हजार 228 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 01 लाख 36 हजार 445 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 744 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 1361 patients discharge in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Khatra: Dangerous – Bold Film | ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार आत्तापर्यंतची सर्वाधिक बोल्ड फिल्म, तुम्हालाही सीन बघून सुटेल घाम..! (व्हिडिओ)

 

Jayant Patil | जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘…म्हणून सरकार स्थापन करताना मुख्यमंत्रीपदाची संधी आम्ही सोडून दिली’

 

Jayant Patil | ‘झुकेंगे नही, लढेंगे और जीतेंगे भी’, जयंत पाटलांचा भाजपला टोला