Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 525 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 525 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

राज्यात आज 992 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 15 हजार 711 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.07 टक्के झाले आहे. राज्यात आज 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 81 लाख 38 हजार 182 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 67 हजार 916 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 4 हजार 476 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 28,878 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 595 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत. राज्यात आज 206 ओमायक्रॉनबाधित (Omycron) रुग्णांची नोंद झाली आहे.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 525 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shane Warne Passes Away | ऑस्ट्रेलियाचा महान फीरकीपटू शेन वॉर्नचं हदयविकाराच्या झटक्याने निधन

 

Aadhaar PAN Link-KYC | 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा 1 एप्रिलपासून व्हाल त्रस्त; जाणून घ्या कोणती

 

Aba Bagul | ‘पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगमधील विद्यार्थी अमेरिकेत शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जाणार’