Coronavirus in Maharashtra : राज्यात गेल्या 24 तासांत 67160 नवे पॉझिटिव्ह, 676 जणांचा मृत्यू

मुंबई : दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 67,160 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 63,818 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये 676 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 42,28,836 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला होता. मात्र, त्यापैकी 34,68,610 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या कोरोनाचे 6,94,480 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 63,928 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात सध्या 41,87,675 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 29,246 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आत्तापर्यंत अडीच कोटींपेक्षा जास्त चाचण्या

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 2,54,60,008 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 42,28,836 चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 34,68,610 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यात नवे 3991 कोरोनाबाधित रुग्ण

पुण्यात गेल्या 24 तासांत 3,991 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर यातील दिलासादायक बाब म्हणजे 4,789 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, यामध्ये 74 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आत्तापर्यंत 7,86,471 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 6,69,234 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 8951 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 1,08,231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईतही वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या

मुंबई, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 5,888 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.