मुंबईत ‘कोरोना’बाधित 29 वर्षीय युवतीची हॉस्पीटलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास कोविड-१९ पॉझिटिव्ह असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात या २९ वर्षीय तरुणीवर उपचार सुरु होते. पहाटे ३ वाजून ४९ मिनिटांनी रुग्णालयातील बाथरूममध्ये या तरुणीनं गळफास घेतला. दरम्यान ह्या तरुणीवर गेल्या ७ दिवसांपासून नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. या तरुणींमध्ये कोरोना संसर्गाची लक्षण दिसत असल्यानं नायर रुग्णालयात चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तरुणीने आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

 

मुंबई मध्ये कोरोना संसर्गाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या मुंबई व परिसरात १ हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहे. ही तरुणी वरळीतील जिजामाता नगर परिसरात राहत होती. कोरोना संसर्ग चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी म्हणजे ७ व्या दिवशी रुग्णालयातील बाथरूममध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीचे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर येऊ शकलं नाही. या प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

यापूर्वी देखील अकोल्यातील कोरोना संसर्ग पॉझिटिव्ह रुग्णाने गळ्यावर ब्लेड मारून आत्महत्या केल्याचा समोर आलं होत. आज धारावीमध्ये अजून ५ नवे रुग्ण सापडले आहे. तर दादर परिसरातही २ रुग्ण आढळले आहे. कोरोनाच हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.